Bodwad

बोदवड येथे कोरोना विषाणू चा सम्पर्क येऊन तो वाढू नये म्हणून नगरपंचायत कडून कडक कार्यवाही

बोदवड येथे कोरोना विषाणू चा सम्पर्क येऊन तो वाढू नये म्हणून नगरपंचायत कडून कडक कार्यवाही

बोदवड, दि.१६ एप्रिल,कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायत बोदवड मार्फत शहरात गर्दीचे स्वरूप होऊन कोरोना व्हायरस चे थैमान होऊ नये म्हणून नगरपंचायत विविध प्रकारची धडक कार्यवाही सुरु केली असून, त्यात शहर निर्जंतुकीकरण करणे,शहर स्वच्छ ठेवून गटारी साफ करणे,यासोबतच विना रुमाल अथवा फेस मास्क न वापरण्याऱ्या व मोकाट फिरणाऱ्या नागरीकानाकडून रू १०० दंड वसूल करण्यात येत आहे.

तसेच सुरक्षित अंतर न पाळणाऱ्या विक्रेत्या कडून सुद्धा दंडनीय रक्कम वसूल करण्यात येत आहे ही धडक मोहीम दिनांक १६ एप्रिल २०२० रोजी सुरू करण्यात आली असून एकून विना मास्क फिरणाऱ्या ५० नागरीकाकडून दंड वसूल करण्यात आला.तसेच शहरातील रुपम प्रोव्हिजन व गुरुनानक स्वीट मार्ट यांचे कडून पाणीपुरवठा अभियंता अमित कोलते,लेखापाल आनंदा वराडे ,स्वच्छता समन्वयक अक्षय जगताप यांचे पथकामार्फत गर्दी असलेल्या दुकानदारावर कार्यवाही करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button