Manmad

कोरोनाचा थैमानात महागाईचा भडका

कोरोनाचा थैमानात महागाईचा भडका

मनमाड | प्रतिनिधी आप्पा बिदरी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या ५० दिवसांपासून मनमाड शहरात जीवनावश्यक वस्तूचे दुकाने वगळता इतर सेवा देणाऱ्या दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच बांधकाम व्यवसायही बंद ठेवण्यात आले होते. मात्र मनमाड नगरपालिकेने लॉकडाऊन अगोदर शहरातील नागरिकांनी बांधकामाची परवानगी घेतली आहे. अश्या नां बांधकाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे बांधकामाला अत्यावश्यक असणारे सिमेंट विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी काळा बाजार सुरू केला असून ३०० रुपयाची सिमेंटाची गोणी मनात येईल त्या दराने विक्री करत असल्याचे बांधकाम क्षेत्रात चर्चा आहे. अश्या अव्वाच्या – सव्वा दराने सिमेंटची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई कोण करणार ? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.

लॉकडाऊनमुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याने मनमाड नगरपालिका प्रशासनाकडून लॉकडाऊन पूर्वी ज्या घरमालकांनी बांधकाम परवानगी घेतली आहे.अशा घरमालकांना नियम व अटी देवून बांधपरवानगी देत आहे. त्यासाठी घरमालकांने नगरपालिकेस अर्ज द्यावा,त्यामध्ये ठेकेदार आणि इंजिनिअर यांचे नावे नमुद करावे, छोट्या बांधकामांना प्रशासनाकडून परवानगी देत असुन मोठ्या बांधकामांना परवानगी मिळणार नाही, अशी खात्रीलायक माहिती सुत्राकडून मिळाली आहे. यायाच फायदा घेवून सिमेंट व्यापाऱ्यांनी सिमेंटाचे दर अव्वाच्या सव्वा भावाने विकत असल्याने घरमालक आणि ठेकेदारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. एकीकडे कोरोनाने थैमान घातले असताना तर दुसरीकडे व्यापार्‍यांनी वाढवलेले दर यामुळे सर्व सामन्य नागरीक आर्थिक संकटात सापडले आहे.

हाई लाईट :

सिमेंट, स्टीलचा काळाबाजार
“लॉकडाउन’च्या काळात सिमेंट, स्टीलची मागणी प्रचंड घटलेली असताना अचानक सिमेंट व स्टीलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत स्टील व सिमेंटचे दर चक्क 40 ते 50 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. सिमेंटचा दर एका गोणीमागे तब्बल 100 ते 125 तर स्टीलच्या दरात टनामागे दोन ते अडीच हजार रुपये वाढ झाली आहे. या दरवाढीमागे स्टील, सिमेंट उत्पादकांनी योजून काळा बाजार केल्याचे मानले जात आहे.

सध्या आहेत दर
घटक———- “लॉकडाउन’पूर्वी——- —“लॉकडाउन’नंतर
सिमेंट (प्रतिबॅग)–240 ते 250———— 400 ते 450
स्टील (प्रतिकिलो)– 36 ते 38———— 46 ते 50

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button