Mumbai

महात्मा राजा रावण यांच्या बदल खरा इतिहास समाज्यात पोहचवा – सुनिता गेंगजे

महात्मा राजा रावण यांच्या बदल खरा इतिहास समाज्यात पोहचवा – सुनिता गेंगजे

मुंबई -दिलीप आंबवणे

महात्मा राजा रावण यांच्या बदल खरा इतिहास समाज्यात पोहचवा व तो इतिहास प्रत्येक आदिवासी माणसापर्यत सागण्याची गरज आहे. असे प्रतिपादन बिरसा क्रांती दलाच्या महिला फोरम मुंबई अध्यक्ष व के ए ग्रुपच्या सुनिता तुकाराम गेंगजे यांनी केले.
दसरा सणानिमीत्ताने महात्मा राजा रावण यांच्या प्रतिमेचे पुजन केले.
त्यावेळी गेंगजे म्हणाल्या, आदिवासी समाजात राजा रावण हा खुप महान समजले जाते व राजा रावण यांचे महत्व हे तरूण पिढीला समजू लागले आहे यामुळे अनेकांनी शहरातून घराघरात राजा रावणाचे पुजन करूण स्मरण केले व अभिवादन केले.
रावण हा आदिवासी गोड जमातील असून तो अतिशय हुशार ताकदवान राजा होता पण ही ताकद कुठे तरी कमी करण्याच्या हेतुने राजा रावण यांना उच्च वर्णीय लोकांनी षडयंत्र करून समाजामध्ये चुकीची माहिती आज पर्यत पसरवली होती पण खरा इतिहास हा आता पुढे येत आहे.
आदिवासी संरक्षक, आदिवासी संस्कृती रक्षक, मातृसत्ताक कुटूंब पध्दतीचा पुरस्कर्ता, चरीञसंपन्न, न्यायप्रिय राजा, अतिशय शूर व महापराक्रमी, बलाढ्य, मातेला सर्वश्रेष्ठ पूजनीय मानणारा, महान यौध्द, चारी वेदांमध्ये पारंगत, सर्व रागाचा बादशाह, त्यांच्या रागामध्ये एवढी ताकद होती की एखादा राग आवळत असताना पावसाचा वर्षाव व्हायचा असा उल्लेख सापडतो. पाच कर्मेंद्रिये आणि पाच ज्ञानेंद्रिये यांच्या आहारी न जाता त्यांना आपल्या मनाच्या आधीन ठेऊन त्यांच्यावर विजय मिळविणारा असा रावण महाराज यांच्या पवित्र स्मृतिदिनास विनम्र अभिवादन प्रत्येकांनी केले पाहिजे. असे मत आदिवासी सुनिता तुकाराम गेंगजे यांनी माडले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button