Karamala

कोवीशील्ड लसीकरण मोहीमेत अरण चा इतर गावांनी आदर्श घ्यावा- डॉ. पाटील अरण शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे योगदान .

कोवीशील्ड लसीकरण मोहीमेत अरण चा इतर गावांनी आदर्श घ्यावा- डॉ. पाटील अरण शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे योगदान .

करमाळा : मोडनिंब आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत कोविशिल्ड कोरोना लसीकरण कॅम्प अरण येथील संत सावता माळी येथे करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी ४५ वर्षावरील नागरिकांना तसेच गंभीर आजार असलेल्या व ६० वर्षावरिल सर्व नागरिकांना मोफत लस देण्यास सुरुवात आज दिनांक ५/०४/२०२१ रोजी झाली आहे.हा कॅम्प अरण येथे ऑनलाईन झालेली नोंदणी केलेल्या व्यक्तिंना लसीकरण होईपर्यंत चालणार आहे. आरोग्य केंद्र मोडनिंब व उपकेंद्र अरण, ग्रामपंचायत अरण यांच्या माध्यमातून या लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. अशाप्रकारे लसीकरण मोहिम घेणारे अरण हे जिल्ह्यातील प्रथम गाव आहे. अरण गावाचा आदर्श इतर गावांनी घेतला पाहिजे असे डॉ.प्रदीप पाटील यांनी सांगितले.
आज पहिल्या दिवशी २२१ व्यक्ती नी लस घेतली आहे.आज पर्यंत मोडनिंब १५०० व्यक्तींना मोफत लस देण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्य केंद्राचे डॉ.शरद थोरात यांनी दिली.
कोवीशील्ड लसीकरणाचा प्रारंभ आज संत सावता माळी विद्यालय अरण येथे करण्यात आला. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, शिवाजी राजे कांबळे माजी समाज कल्याण समिती सभापती, सरपंच सुरत्नप्रभाताई ताकतोडे, यशवंत दादा शिंदे,दिपक ताकतोडे,डॉ. प्रदीप पाटील,डॉ. थोरात,सतीश माने,डॉ. योगिता माने, प्राचार्य हरिदास रणदिवे,अरण केंद्राचे केंद्रप्रमुख व उपकेंद्र संपर्क अधिकारी डॉ.विलास काळे, मुख्याध्यापिका शांता वाघमोडे, श्रीकांत पावणे, जिल्हा परिषद शाळा अरण व सर्व वस्ती शाळा शिक्षक स्टाफ तसेच माध्यमिक शाळा शिक्षक स्टाफ उपस्थित होते.विनायक बिराजदार, वनिता कुलकर्णी,अर्पिता यादव,गोपाळ राऊत, अश्विनी गाडे, वैशाली सूर्वे,मनीषा गायकवाड, मंदाकिनी ओहोळ,कदम एन. एन. वंदना गाडे अरण येथील आशा वर्कर रुक्मिणी साळुंके,आशा वसेकर, बाई ताकतोडे, प्रियांका शिंदे,सोनाली दळवी अश्विनी दळवी, तलाठी महेश घाडगे, ग्राम विकास अधिकारी बी. व्ही. हारगे व अमर शिंदें, विजय केदार
हे कर्मचारी लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींना सहाय्य करत आहेत.

Leave a Reply

Back to top button