Pandharpur

प्रभाग क्र.14 मधिल पोलमध्ये ठेकेदार करत आहे झोल

प्रभाग क्र.14 मधिल पोलमध्ये ठेकेदार करत आहे झोल

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर शहरातील सर्व नागरिक आपल्या कष्टाच्या कमाईतून पंढरपूर नागरपरिषदेला कर भरत आहेत परंतु नगरपरिषद हेच पैसे ठेकेदारांच्या घशात घालत असल्याचे चिञ दिसत आहे शहरातील प्रभाग क्रमांक चौदा जिजाऊ नगर येथील रस्त्यांलगत बसवण्यात आलेले रोडलाईट पोल बसवण्याचं काम सुरू असून याठिकाणी कोणत्याही नियम अटीच पालन न करता पंढरपूर नगरपरिषद रोडलाईट विभागाचा अनागोंदी कारभार समोर येत आहे वास्तविक पहाता या प्रभागामध्ये पाच वर्षांतुन कुठ रोडलाईट पोल आले त्यातही काहीतरी झोल होत असल्याने यामध्ये नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधारी नगरसेवकांना विकास कामांच्या मुद्यावर नागरिकांच्या तीव्र रोषास समोर जावे लागणार आहे गेल्या पाच वर्षांमध्ये प्रभागातील अनेक नागरिकांच्या अपेक्षांना नगरसेवकांकडून जी वागनूक मिळाली त्याची येणाऱ्या निवडणुकीत मतरूपी परतफेट करणार असल्याचे या प्रभागातील मतदारांमधून बोलले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button