Yawatmal

सिमेंट रोड़ व नालीचे बांधकाम त्वरित सुरू करावे..ए.आय.एम.आय.एम.ची मागणी

सिमेंट रोड़ व नालीचे बांधकाम त्वरित सुरू करावे..ए.आय.एम.आय.एम.ची मागणी..

रूस्तम शेख प्रतिनिधी यवतमाळ

यवतमाळ जिल्हयात पुसद येथील कानडे-ले-आऊट मध्ये नाली व सिमेंट काँक्रेट रोड़चे काम लवकरात लवकर सुरू करावे या मागणी संदर्भात एम आय एम च्या वतीने मुख्यधिकारी न प पुसद यांना निवेदन देण्यात आले .

या बाबत सविस्तर माहिती अशी स्थानिक कानडे लेआऊट मध्ये नगर परिषद च्या माध्यमातुन कामाचे भुमिपुजन यापुर्वी .नगर परिषदचे अध्यक्ष व नगर परिषद बांधकाम समिती पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले .
परंतु अजुन पर्यंत सदर काम सुरु झाले नाही

सध्या परिस्थितीत पावसाळा सुरु असुन नालीचे बांधकाम पुर्ण झाले नसल्याने घरा मध्ये कचरा व घाण युक्त पाणी शिरत आहे . त्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका होण्याची दाट शक्यता असुन नागरीकांना भयंकर त्रास सहन करावे लागत आहे .

या बाबत वार्डातील नागरीकांनी या पुर्वी नगर परिषद ला लेखी व तोंडी मागणी केली आहे . परंतु संबधीत नगर परिषद प्रशसणाने याची गांर्भीयाने दखल घेतली नसुन अजुन पर्यंत नालीचे व सिंमेंट क्रांकीट रोडचे बांधकाम सुरु केले नाही .
नागरीकांना होणाऱ्या त्रासा पासुन मुक्ती मिळावी या उद्देशाने वार्डातील नागरीक व एम आय एम पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीने नगर परिषदचे मुख्याधिकारी किरण सुकलवाड यांच्याकडे निवेदन सादर केले . निवेदन देते वेळी अमजद खान तालुकाध्यक्ष एम.आय. एम, मिर्झा आदिल बेग जिल्हा प्रतिनिधी , फिरोज खान एम.आय.एम युवक तालुकाध्यक्ष, डॉ.अन्सार महासचिव, अमनुल्ला खान शहर सचिव, अब्दुल रहेमान चव्हाण व अन्य नागरिकांचे सह्याने देण्यात आले .या प्रसंगी पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते .या मागणीच्या संदर्भात नगर परिषद काय निर्णय घेते या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button