Pune

इंदापूरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा..

इंदापूरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा..

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : इंदापूर येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील जेतवन बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेदस प्रा.बाळासाहेब मखरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीस प्रा.सुहास मखरे यांनी पुष्प अर्पण करुन दिप प्रज्वलन केले. सामुदायिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करुन प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
ॲड. सुरज मखरे यांनी संविधानातील मजबूत अधिकार विषद करत संविधानाचे महत्व पटवून दिले.
यावळी पवन मखरे, अक्षय मखरे, दया मखरे, तुषार मखरे, सुहास मखरे, नागेश सोनवणे, सिद्धांत खरे, रोहित मखरे, सागर मखरे, उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने विशेष परिश्रम घेतले.
अक्षय मखरे यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button