Nashik

नासिक पंचवटी पोलीस ठाण्याचे हवालदार अनिल जमदाडे यांची ओढा येथे रेल्वेखाली आत्महत्या

नासिक पंचवटी पोलीस ठाण्याचे हवालदार अनिल जमदाडे यांची ओढा येथे रेल्वेखाली आत्महत्या

नाशिक=नाशिक पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल जमदाडे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अनिल तानाजी जमधाडे वय- वर्ष ५० असे आत्महत्या केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. जमधाडे यांनी गुरुवारी नुकतीच ओढा रेल्वे रुळावर आत्महत्या केली. या घटनेमुळे नाशिक पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे
अनिल जमधाडे हे दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील रहिवासी होते. सध्या ते पंचवटी येथील रासबिहारी लिंक रोडवरील मानेनगर परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
याप्रकरणी आडगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनिल जमदाडे हे १९९१ मध्ये पोलीस दलात रुजू झाले होते.
मनमिळावू स्वभावाच्या जमदाडे यांच्या निधनामुळे पोलीस वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास आडगांव पोलीस करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button