यावल

नागरिकत्व सुधारणा अधिनियमा बद्दल केंद्र शासनाचे अभिनंदन.

नागरिकत्व सुधारणा अधिनियमा बद्दल केंद्र शासनाचे अभिनंदन.

यावल तहसील समोर राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा.

यावल दिनांक 19 ता.प्र. सुरेश पाटील

नागरिकत्व सुधारणा अधिनियमा बद्दल केंद्र शासनाचे यावल तालुक्यातून सर्व स्तरातून अनेकांनी अभिनंदन केले आहे, तसेच देशात काही ठिकाणी हिंसक आंदोलन करणारे व आंदोलनाचे जिहादी प्रमुख सूत्रधार व त्यांचे समर्थकांवर तात्काळ कठोर कारवाई करणेसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात आज यावल तहसील कार्यालयासमोर अनेकांनी सहभाग घेऊन तीव्र निषेध व्यक्त करीत कारवाई मागणी केली.
यावल तहसील कार्यालयासमोर आज दिनांक 19 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय हिंदू आंदोलन छेडण्यात आले, नागरिकत्व सुधारणा अधिनियम संपूर्ण देशात लागू झाल्याने अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन सुरू झाली आहेत त्यामुळे हिंसक आंदोलने करणाऱ्यांवर शासनाकडून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करीत निषेध नोंदवून तहसीलदार यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले नागरिकत्व सुधारणा अधिनियमामुळे शरणार्थी हिंदू, शीख , पारशी, इत्यादींना भारतीय नागरिकत्व मिळणार असल्याने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करणाऱ्यांनी केंद्र सरकारचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
आंदोलनात हिंदू जनजागृती समितीच्या प्रचारक सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी किशोर कुळकर्णी यांनी आपले प्रखर विचार व भूमिका मांडून शासनाकडे मागण्यांचे निवेदन दिले, यावेळी ब्रह्मा अंकलेकर, धर्मेंद्र चौधरी, दगडु जंगले, सौ छाया भोळे, सौ.निलिमा अजय नेवे, राहुल कोळी, भरत चौधरी, प्रशांत बारी, पितांबर फेगडे, लखन नाथ, भास्कर वारके, राहुल महाजन, हरीश पाटील, नितेश कोळी, अरविंद वारुळकर, महेश नन्नवरे, शुभम महाजन, हितेश देशमुख, नीलेश महाजन, सोपान पाटील, सागर झोपे, दीपराज कोळी, आदिनाथ अढ़ळकर, पराग सराफ, जितेंद्र नेवे, सुनील फेगडे, पंकज पवार, यशवंत सोनार, मयूर कुंभार, दीपक मोते, खुशाल पाटील, ईश्वर सपकाळे, सोहन नारेकर, भिकन कुंभार इत्यादी समाजसेवक, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, तसेच हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button