Rawer

निंभोरा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामात घोळ… कामात अपूर्णतः

निंभोरा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामात घोळ… कामात अपूर्णतः

संदिप कोळी रावेर

रावेर : निंभोरा बु. ता. रावेर येथील मुख्यमंत्री पेयजल योजना 62 लाखाची असतांना 42 लाखाची बिलं लवकर काढण्याच्या घाईने, सत्ता पालट झाली तर बिलं काढण्यात अडचण येईल म्हणून थातूरमातुर काम करून,पुर्ण दाखवून बिल काढण्यात आली, प्रत्यक्षात काम पुर्ण झालेले नाही. कामे अपूर्ण झाल्याची तक्रार येथील ग्रामस्थांने दिलेली आहेच. दुसरा घोळ म्हणजे ही योजना ग्रामपंचायतच्या ताब्यात देणारे ठेकेदार, इंजिनियर ,व ताब्यात घेणारे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांच्या स्टॅम्प प्रतिज्ञा पत्रावर सही असल्याचा, नसल्याच्या चर्चा सोशल मीडिया वर रंगू लागली आहे.
कोणतीही योजना गावात पुर्ण झाल्यावर ती ग्रामपंचायत कडे हस्तातंरित केली जाते, दिल्याची ताबा पावती पत्र दिले व घेतले जाते. त्याच पद्धतीने येथील मुख्यमंत्री पेय जल योजना पुर्ण झाल्याबाबत ग्रामपंचायतने ताबा पत्र 100₹ च्या प्रतिज्ञा पत्रावर दिले गेले, परंतु ज्या अधिकाऱ्यांनी ताबा पावती ग्रामपंचायत कडे दिली. ज्या ग्रामसेवकांनी ताबा घेतल्याची सही केली. असे दाखविले गेले आहे. परंतु या सही बाबत ग्रामसेवक गणेश पाटील यांनी स्पष्ट नकार देत माझी सही नाही या योजनेशी माझा काही संबंध नाही, व ताबा पावती बद्दल मला काहीही माहिती नाही असे सांगत माहीती देण्यास टाळाटाळ केली. माजी सरपंच डिगंबर चौधरी ही असेच सांगत आहे माझी सही नाही, ताब्यात घेणारे म्हणता माझी ही सही नाही.मग योजना हस्तानंतरित होऊन बिलं कशी निघाली हे एक गूढच आहे.
ही योजना ग्रामपंचायत ने खरंच ताब्यात घेतली का?/ नाही? जर घेतली तर त्यांच्या कडून इन्कार का. यामुळे हा विषय संभ्रमात टाकणारा आहे, मुख्यमंत्री पेयजल योजना राबविण्यात आली खरी पण ग्रामपंचायतने कामावर लक्ष दिले नाही. व्हाल, पाईप लाईन कामात अपूर्णतः आहे, बिलं काढण्याच्या घाईने, योजना गुंढाळण्यात आली. याबाबत चौकशी होत, दूध का दुध पाणी का पाणी व्हावे.
ही योजना ताब्यात घेतली ताबापत्रावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह्या आहेत, परंतु दोन्हीनी साफ नकार दिला व ठेकेदार, इंजिनियर यांच्या वर ठपका ठेवला.तर संबंधित व्यक्तींनी सह्या त्यांच्याच असल्याचे सांगितले.तरी चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button