Faijpur

फैजपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद आवारातील काँक्रीटीकरणाचे वाजणार तीन तेरा

फैजपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद आवारातील काँक्रीटीकरणाचे वाजणार तीन तेरा
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : फैजपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद आवारातील काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाच्या काही भाग खोदण्यास सांगितले परंतु ९५ टक्के झालेले कामाचे काय असा प्रश्न उपस्थित झालेला असून काल आपल्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तामुळे पालिका क्षेत्रात व नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून गेल्या एक ते दीड महिन्यांपासून मौलाना अबुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्स आवारात काँक्रिटीकरण व नाला दुरूस्ती चे काम बाहेरील एका ठेकेदाराला ऑनलाईन पध्दतीने मिळाले आहे परंतु एक ते दीड महिन्यांपासून काँक्रिटीकरण सुरू झाले तेव्हापासून येथील नगरपरिषदेची इंजिनीयर फारुकि हे कामाचा पाठलाग करत असूनसुद्धा ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरूच असल्याचे निदर्शनात येत आहे नगरपरिषदेची इंजिनीयर जातीने लक्ष देऊन सुद्धा ठेकेदार हा मनमानी कारभार आणि माती मिक्सिंग रेतीच्या यामध्ये सर्रास वापर करीत आहे नगरपरिषदेचे इंजिनीयर फारुकि यांनी आज ठेकेदाराला झालेले काँक्रिटीकरण खोदून लावण्यास सांगितले जवळजवळ पंचवीस ते तीस फूट एवढा काँक्रीटीकरण नगरपरिषदचे इंजिनिअर यांनी खोदण्यास भाग पाडले परंतु ९० टक्के झालेल्या काँक्रीटीकरणाचे काय असा प्रश्न उपस्थित झाला झाला आहे या काँक्रीटीकरणामध्ये गिरणा रीती च्या जागी जवळपासच्या माथी मिक्सिंग रेती चा सर्रास वापर असून सिमेंट सुद्धा हलक्या दर्जाचे वापरण्यात येत आहे पुढील काम आटोक्यात येत असताना मागील आठवड्यात झालेल्या काँक्रिटीकरण चे तीनतेरा वाजत आहे आज नगरपरिषदेची इंजिनीयर फारुकी यांनी तळ ठोकून काँक्रिटीकरण सुरू असताना उत्तम दर्जाचे काम पाहिजे असे सांगितले आणि ही रेती चालणार नाही असे सांगितले तरीसुद्धा ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असून काम पुन्हा सुरू करण्यात आली केवळ दहा टक्के काम राहिलेले असताना पालिकेचे इंजिनिअर म्हणतात काँक्रीटीकरण उत्तम दर्जाचे पाहिजे परंतु ९० टक्के झालेल्या कामाचे काय असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे कामांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली असून शासनाचे एक कोटी रु पहिल्याच पावसात पाण्यात जाणार् असल्याचे चित्र आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button