Faijpur

फैजपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद शॉपींग कॉम्प्लेक्स आवारात काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे चौकशीची मागणी

फैजपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद शॉपींग कॉम्प्लेक्स आवारात काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे चौकशीची मागणी
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : येथील नगर परिषद अंतर्गत होणार्या काँक्रीटीकरण हे निकृष्ट दर्जाचे असून या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे येथील गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या नगर परिषद अंतर्गत होणार्या मौलाना अबुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्स आवारात काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून एक कोटी रुपयांचे या काँक्रिटीकरणा सह नाला दुरूस्तीचे सुद्धा काम यामध्ये सुरू आहे गेल्या एक महिन्यापासून या काँक्रीटीकरणाचे काम नगरपरिषद अंतर्गत एका ठेकेदाराला मिळाले आहे या ठेकेदाराला ऑनलाईन पध्दतीने मिळालेले हे काम आहेत परंतु या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून निकृष्ट दर्जाची नदीपात्रातली माती मिक्सिंग रेती च्या वापर करण्यात येत असून गिरणा रेतीचा किंवा उत्तम दर्जाची रेती या कामात कुठेही दिसून येत नाही स्वतः नगरपरिषदेची इंजिनीयर फारूकि गेल्या एक महिलेच्या कार्यकाळापासून काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना या कामावर हजेरी लावत असून स्वतः देखरेख करीत असताना ठेकेदाराच्याला वेळोवेळी सांगत आहे की तुम्ही हे काम बरोबर करीत नसून नगर परिषदेच्या इंजिनीयरचे सुद्धा हे ठेकेदार कानावर घेत नसून मनमानी कारभार सुरु असल्याचे निदर्शनात येत आहे या काँक्रीटीकरणामध्ये हलक्या दर्जाची आसारी गिरणा रेतीच्या जागी जवळपासच्या माती मिक्सिंग रेती च्या सर्रास वापर करण्यात येत आहे या कामात कोणतीही मोजमाप लेव्हल ढाल दिसून येत नाही यामध्ये तफावत दिसत आहे ज्याप्रमाणे ऑनलाइन पध्दतीने या ठेकेदाराला काम मिळाले आहे त्या पध्दतीने हे काम पारदर्शक करायला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे या काँक्रीटीकरण मध्ये सर्रास गिरणा रेती ऐवजी नदीपात्रातील माठी मिक्सिंग रेतीच्या वापर केला जात असून या काँक्रिटीकरणा मध्ये अर्धवट आसारी टाकून काम आटोक्यात आणले जात आहे अल्प प्रमाणात सिमेंटचा सुद्धा यामध्ये वापर केला जात आहे मौलाना अबुल कलाम आझाद या नावाने शॉपिंग कॉम्प्लेक्स असून या कामाचा ठेका एक कोटी रूपयाला एका ठेकेदाराला ऑनलाईनने पद्धतने मिळाले आहे या काँक्रीटीकरणामुळे सर्वत्र तफावत दिसत असून हे काम इस्टीमेटप्रमाणे केले जात नाही पहिल्याच पावसात शासनाचे एक कोटी रु पहिल्याच पावसात पाण्यात जाणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे तरी या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button