Pandharpur

स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित आरोग्य शिबीराची सांगता

स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित आरोग्य शिबीराची सांगता

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन 11ऑगस्ट पासून तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर केले गेले होते त्याचा समारोप 23 ऑगस्ट रोजी कासेगाव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आला या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून बरेच रूग्ण हे मोतीबिंदू शस्त्रक्रीयेसाठी पात्र ठरले आहेत. कोरोनामुळे गेल्या दिड वर्षात नेत्र शस्त्रक्रिया रखडल्या असल्या कारणाने या शिबिरातून आपण आता नियोजनपूर्वक सर्व पात्र रुग्णाच्या मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचे आयोजनकांच्या वतीने सांगण्यात आले यावेळी या शिबिराचा सांगता समारंभ ही संपन्न झाला.

संबंधित लेख

Back to top button