Delhi

टी बी देशमुक्त अभियानासाठी केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत संपन्न

टी बी देशमुक्त अभियानासाठी केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत संपन्न

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

आज दि. 25 नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली Indian Council for Medical Research सचिव प्रा. बलराम भर्गव, Department of iotechnology सचिव डॉ. राजेश गोखले आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार चे अतिरिक्त सचिव श्रीमती आरती आहुजा तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 2025 पर्यंत क्षयरोग समाप्त करण्याच्या धोरणांवरील समीक्षा बैठक पार पडली. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी SDG लक्ष्यापेक्षा पाच वर्षे अगोदर 2025 पर्यंत भारतातील क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे धेय निर्धारित केले आहे त्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्र येऊन सदर लक्ष साध्य केले पाहिजे असे डॉ. पवार यांनी नमूद केले. डॉ. पवार म्हणाले की आपणास नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची गरज आहे तसेच
समुदायासह विविध भागधारकांच्या सहभागाद्वारे टीबी उन्मलून कार्यक्रमाचा विस्तार करून सदर प्रकरणे लवकर शोधणे आणि क्षयरोगाची नवीन प्रकरणे उद्भवण्यास प्रतिबंध करणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. आपण सर्वांनी एकजुटीने देशव्यापी टीबी मुक्त भारत अभियान हे यशस्वी व्हावे यासाठी दृढ संकल्प केला पाहिजे. यासाठी देशातील सर्व राज्यांवर तसेच पूर्वोत्तर राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे असे त्यांनी नमूद केले. यासोबत टिबी उन्मलून कार्यक्रमाच्या प्रगतीची प्रत्येक महिनावार विस्तृत समीक्षा केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button