यवतमाळ

कात्री येथे सदगुरु नारायण महाराज पुण्यतिथी साजरी

कात्री येथे सदगुरु नारायण महाराज पुण्यतिथी साजरी

रूस्तम शेख यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ :- यवतमाळ जिल्हयातील कळंब तालुक्यात मौजा कात्री येथे गणेश मठ कात्री व्दारा सदगुरू नारायण महाराज यांची पुण्यतिथी गणेश मठाचे अध्यक्ष ह भ प्र मा ज्ञानेश्वरराव डफर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली

गावामध्ये जातीय सलोखा निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता अखंड राहावी ,गावातील युवा पिढी व्यसनमुक्त व्हावी,तसेच गावातील सर्व नागरीक एकत्र येऊन गावाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने दरवर्षी पुण्यतिथी आयोजित करण्यात येत असल्याची माहिती ह प्र भ ज्ञानेश्वरराव डफर महाराज यांनी दिली
या प्रसंगी गावात पालखीची मिरवणुक काढण्यात आली या मिरवणुकीत हिंदु , मुस्लीम तसेच सर्व समाजाचे बांधव सहभागी झाल्याने राष्ट्रीय एकात्मता व बंधुत्वाचे प्रदर्शन झाल्याची माहिती आमचे प्रतिनिधी रूस्तम शेख यांनी दिली या पुण्यतिथी महोत्सवात बहुसंख्य गावातील नागरीक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button