Malegaon

पोलीस अधीक्षक आरती सिंग यांचे सुप्रिया सुळेंकडून कौतुक

पोलीस अधीक्षक आरती सिंग यांचे सुप्रिया सुळेंकडून कौतुक

उदय वायकोळे

नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंग यांचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्विटरद्वारे गोड कौतुक केले आहे.मालेगाव शहर तसे पहिल्यापासूनच संवेदनशील समजले जाते.ज्या वेळी कोविड19 ची परिस्थिती मालेगावमध्ये वाढत जाऊ लागली तेव्हापासून डॉ आरती सिंग नाशिक ग्रामीण मुख्यालयातून बाहेर पडून मालेगावमध्ये तळ ठोकून आहे. परिस्थती नियंत्रणात आणणेसाठी प्रशासन,पोलीस विभाग सर्वांकडूनच जिकिरीचे प्रयत्न केले जात आहे,अश्या कामामुळे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्विटरद्वारे डॉ आरती सिंग यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Back to top button