Pune

शेतकरी कृती समितीने केले सरडेवाडी टोल नाक्यावर टोल फ्री आंदोलन

शेतकरी कृती समितीने केले सरडेवाडी टोल नाक्यावर टोल फ्री आंदोलन

पुणे दत्ता पारेकर

पुणे :बळीराजाला त्यांच्या शेतमाल वाहतूकीसाठी गेली सात वर्षापासून अपूर्ण असलेला सर्विस रोड तात्काळ सुरू करावा व अन्य इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या टोलफ्री आंदोलनाला यश मिळाले आहे.या आंदोलनात युवा शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यावेळी टोल प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.

या आंदोलनात शेतकरी कृती समितीचे प्रमुख व इंदापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे रमेश शिंदे, अनिल पवार ,नगरसेवक अमर गाडे, गजानन गवळी ,संजय शिंदे , खाजा बागवान भारत शिंदे, नितीन ननवरे सुधीर पारेकर ,यांच्या सह शेकडो शेतकरी उपस्थित होते. दरम्यान

आज रविवार दि.18 आँक्टोंबर रोजी युवा नेते पोपट शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर सकाळी ११ वाजता टोल टोल फ्री आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकरी एकवटले होते.एका आठवड्यापूर्वीच पोलीस प्रशासनाला आणि टोल नाका प्रशासन यांना यासंदर्भात लेखी निवेदन देऊन देखील अंमलबजावणी न झाल्याने अखेर आज चिडलेल्या बळीराजाने टोल फ्री आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.

सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालेले आंदोलन तब्बल दिड तास सुरू होते. आंदोलनाला वेगळे वळण लागू नये म्हणून दोन पोलीस निरीक्षकांसह चार पोलीस उपनिरीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.तर या आंदोलनासाठी बारामती आणि दौंड वरून मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा बोलावण्यात आला होता. मात्र या पोलीस फाट्याला न जुमानता संतापलेले बळीराजा पुत्र आपल्या भूमिकेवर ती ठाम राहिल.सुमारे दिड तास चाललेल्या या आंदोलनात लाखो रुपयांचा महसूल बुडला गेला. आंदोलन त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने अखेर प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. आंदोलकांना सरडेवाडी टोल प्रशासनाचे मेंटनस हेड अमर सपाटे यांच्याकडून तसे लेखी देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button