Yawal

राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्या : ना.वेड्डीट्टीवारांना साकडे

राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्या : ना.वेड्डीट्टीवारांना साकडे

यावल, ( शब्बीर खान ) महाराष्ट्रासह जळगाव जिल्हयात आणि यावल तालुक्यातही अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरीव व वाढीव आर्थिक मदत नुकसान भरपाई मिळावी आणि पिकविम्याची रक्कम दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याकामी आपण प्रयत्न करावा अशी मागणी जळगाव ग्रामीण जिल्हा सेवा फाउंडेशनचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी राज्याचे मदत आणि पुनवर्सन मंत्री ना. विजय वेड्डीट्टीवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

जळगाव विमानतळावर राज्याचे मदत आणि पुनवर्सन मंत्री ना. विजय वेड्डीट्टीवार आले असता त्यांना निवेदन देण्यात आले. राज्य शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाईची मदत तसेच पिकविम्याची रक्कम दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व अजून वाढीव मदत मिळावी तसेच कपाशी, सोयाबीन प्रमाणे ज्वारी पिकाचे आणि मका पिकाचे सुद्धा नुकसान झाले असून ज्वारी, मका, या पिकांना सुद्धा भरपाई मिळावी आणि सरसकट मिळावी अशे निवेदन काँग्रेस सेवा फौंडेशन तर्फे देण्यात आले यावेळी काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष ,काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल,रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दाम शाह, जिल्हामीडिया प्रमुख तथा कोरपावली गावाचे सरपंच विलासभाऊ अडकमोल आदी उपस्थित होते सदर निवेदनावर तालुकाध्यक्ष अभय महाजन, तालुकामीडिया प्रमुख धिरज पाटील, शहराध्यक्ष नईमभाई शेख यांच्या सह्या आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button