Nashik

कम्युनिस्ट पक्षाचा पाथर्डी फाट्यावर नाशिक मनपा निवडणूक 2022 संदर्भात मेळावा संपन्न

कम्युनिस्ट पक्षाचा पाथर्डी फाट्यावर नाशिक मनपा निवडणूक 2022 संदर्भात मेळावा संपन्न

नाशिक प्रतिनिधी-
काल शनिवार दिनांक 22 जानेवारी रोजी नरहरी नगर, पाथर्डी फाटा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सिटुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष कॉ. डॉक्टर डी.एल.कराड व नाशिक वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष कॉ. तुकाराम सोनेजे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये नाशिक महानगरपालिकेची आगामी निवडणूक 2022 ह्यासंदर्भात कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

वाढती महागाई ,बेरोजगारी व सर्व सामान्य जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न यावर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 31 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संपूर्ण ताकदीनिशी तीनही जागा लढवणार असून तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष व कार्यकर्ते पूर्ण प्रामाणिक पणे प्रयत्न करेल असा निर्धार करण्यात आला. आगामी निवडणुका बघता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली असून त्यांच्या संदर्भात गल्लोगल्ली बैठका आयोजित करण्यात आल्या आहे.
सर्व सामान्य कामगारांना ह्यात प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येईल असे यावेळी डॉ.डी.एल.कराड यांनी याप्रसंगी प्रतिपादन केले,
या कार्यक्रमामध्ये कॉ.तुकाराम सोनजे,कॉ. राहुल गायकवाड, कॉ. ज्ञानेश्वर काजळे ,कॉ.विजय जाधव, कॉ. आकाश डावरे, कॉ. नागेश्वर बच्छाव ,कॉ.शरद बोराडे ,कॉ.विलास वाघमारे, कॉ. आत्माराम डावरे, कॉ.सुनिल खरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषण करतांना डॉ. कराड यांनी प्रभाग क्रमांक 31 मध्ये प्रत्येक नगरात सिटुची एक कमिटी बनवण्याचे आव्हान केले तसेच प्रभागात अजुन जास्तीत जास्त मेळावे घेण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
या मेळाव्याचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ. आत्माराम डावरे यांनी केले.
यावेळी मोठ्या संख्येने कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button