Chandwad

महिला दिनाचे औचित्य साधून चांदवडला वरचे गाव परिसरात भूमिगत गटारींच्या कामाचा शुभारंभ

महिला दिनाचे औचित्य साधून चांदवडला वरचे गाव परिसरात भूमिगत गटारींच्या कामाचा शुभारंभ

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : आज सोमवार दिनांक – ०८ मार्च २०२१ महिला दिनाच्या औचित्य साधून वरचेगांव श्रीराम कॉलनी ( प्रभाग क्र. ०१ / ०८ ) जनरल होस्टेल मागे,भुमीगत गटार व रस्ता कॉंक्रेटीकरण कामाचे भूमीपुजन करण्यात आले.जनरल होस्टेल मागील श्रीराम कॉलनी परिसरात आज चांदवड चे प्रथम नगराध्यक्ष श्री भुषण कासलीवाल , नगरसेविका श्रीमती शालीनीताई भालेराव , नगरसेवक श्री जगन आबा राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांचे शुभहस्ते विकास कामाचे भुमीपूजन करण्यात आले. व नगरसेवक श्री जगन आबा राऊत यांनी संपूर्ण कॉंक्रेटीकरणाची माहीत दिली. याप्रसंगी श्री पप्पूशेठ भालेराव व संजय पाडवी यांचेहस्ते संतपूजन व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधुन सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
याप्रसंगी श्री विठ्ठल महाजन , सुनिल भोसले , शंतनु बिनायक्या , श्री बच्छाव , कान्हा सोनवणे , सुरेश दवंडे , संतोष भालेराव , दत्ता वाघ , चंद्रमा मिस्त्री , श्री निकम , अण्णा बेलदार , राजू बेलदार , गणेश शिंदे ,नितीन फांगळ, निखिल राऊत, गणेश गायकवाड,सुनिल सुर्यवंशी,अक्षय राऊत,सारंग धामने आदि नागरिक उपस्थित होते. महिला दिना निमित्तानं समस्त महिला वर्गाची विशेष उपस्थिती यावेळी लाभली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button