Nashik

भन्ते दिपंकर (चैत्यभूमी) यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तीभूमी येवला येथे श्रामनेर शिबिरास प्रारंभ

भन्ते दिपंकर (चैत्यभूमी) यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तीभूमी येवला येथे श्रामनेर शिबिरास प्रारंभ

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : येवला येथे धर्मांतर घोषणेचा ८६व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा,मुक्तीभूमी प्रतिष्ठाण आयोजित श्रामनेर शिबीराचे उदघाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येवला तालुका भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव होते भन्ते दिपंकर (चैत्यभूमी) यांच्या मार्गदर्शनाखाली १० दिवसीय श्रामनेर शिबिरास प्रारंभ करण्यात आला आहे
समता,स्वतंत्र,न्याय तत्व सांगून आर्य अष्टांगिक मार्गाचा स्वीकाराचा अडीज हजार वर्षाहून अधिक काळ आधी दिलेला धम्म आजच्या आधुनिक युगात ही काळ सुसंगत आहे. मानवी दुःखाच्या मुळाशी जाऊन बुध्द धम्म माणसास जीवनाचा आदर्श असा सम्यक जीवन मार्ग देतो असे मत भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ नेते नामदेव पगारे यांनी येवल्यात मुक्ती भुमी येथे बोलताना व्यक्त केले.
श्रामनेर शिबिरातील धम्म श्रामनेर होणे हा नवा जन्मच आहे असे मत भारतीय बौद्ध महासभेचे पूर्व जिल्हा अध्यक्ष गौरव पवार यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षक उत्तम प्रधान (इंदोर,मध्यप्रदेश) जिल्हा सरचिटणीस राजू जगताप,मुक्ती महोत्सव समितीचे प्रवर्तक-निमंत्रक प्रा.शरद शेजवळ जिल्हा नेते गौरव पवार ,सतिष गांगुर्डे,विजय गांगुर्डे, मनोज गाडे रत्नकर साळवे, संजय पगारे, अरुण जाधव, भाऊसाहेब जाधव, आदि मान्यवर उपस्तित होते
दिनांक ४ ते १३ ऑक्टोबर दरम्यान दहा दिवस चालणाऱ्या या शिबिराचा माध्यमातून बुद्ध धम्माचा इतिहास वर्तमान, भविष्यकाळ, या वर मान्यवरांचे मार्ग दर्शन रहाणार आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू जगताप सूत्रसंचालन प्रकाश जगताप तर दीपक गरुड यांनी आभार व्यक्त केले शिबिर यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी भाऊसाहेब जाधव, भाऊसाहेब झालटे भगवान साबळे, वसंत घोडेराव दयानंद जाधव बाबुराव पगारे आदिनि विशेषतः मेहानत घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button