Mumbai

“ह्या” तारखेपासून होतील महाविद्यालये सुरू..!उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांची घोषणा..! हे असतील नियम..!

“ह्या” तारखेपासून होतील महाविद्यालये सुरू..!उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांची घोषणा..! हे असतील नियम..!

मुंबई देश राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 8 वी ते 10 वी चे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. त्यानंतर कॉलेज कधी सुरु होणार याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील कॉलेज सुरु होणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात तिथल्या परिस्थितीनुसार वेगवेगळी नियमावली असणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येईल.
जे विद्यार्थी हजर राहू शकणार नाही त्यांच्या साठी ऑनलाईन शिक्षणाची सोय कॉलेजने करावी, विद्यापीठ महाविद्यालय वर्ग 50% पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असतील, कोरोनाचा प्रदूर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असतील, डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे वसतीगृह टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा आदेशही देण्यात आले आहेत. शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापकांच लसीकरण झालेलं पाहिजे अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button