Pandharpur

सहकारातील कुप्रव्रत्तिना विरोध केला तरच सहकार सर्वसामान्य जनातेचा आधार बनेल,,

सहकारातील कुप्रव्रत्तिना विरोध केला तरच सहकार सर्वसामान्य जनातेचा आधार बनेल,,


रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, सहकार सेना अध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या
मुंबई येथील सहकार मेळाव्यात सौ शर्मिला राज ठाकरे यांचे प्रतिपादन
रविवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथील चिंचपोकळी येथील सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या पदाधिकारी मार्गदर्शन शिबिरात शर्मिला राज ठाकरे बोलत होत्या,यावेळी सहकार मार्गदर्शन पुस्तकाचे प्रकाशन सौ शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की सध्या महाराष्ट्र तील काही ब्रहष्ट लोकांचा शिरकाव सहकार क्षेत्रात झाल्यामुळे सहकारातील विश्वास अहर्ता धोक्यात आली आहे, या प्रवृत्तींना वेळीच विरोध करणे गरजेचे बनले आहे आशा लोकांना सहकारातून बाजूला सारल्याशिवाय सहकार सर्वसामान्यांचा आधार बनणार नाही,यावेळी बोलताना माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विविध सहकारी संस्था स्थापन करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा,,या मेळाव्याचे उदघाटन सरचिटणीस सौ शालिनी जितेंद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की सहकाराच्या माध्यमातून महिलांना मदत करून महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मनसेने प्रयत्न करणे गरजेचे आहे,
मुंबईत हजारो गृहनिर्माण संस्था आहेत त्यांना मनसेच्या माध्यमातून मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम करावे असे आवाहन मनसे नेते अभिजित पानसे यांनी केले, माजी आमदार मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर यांनी ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून सर्वमसमान्य जनता, शेतकरी, याना मदत करून सहकारी बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास मदत करावी असे आवाहन केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ,सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीपबापू धोत्रे यांनी आयोजित केलेल्या एकदिवसीय ‘सहकार प्रशिक्षण शिबिर. मुंबईतील चिंचपोकळी येथे आयोजित करण्यात आले होते,
या शिबिराला सौ शर्मिला राज ठाकरे, माजी गृहमंत्री मनसे नेते बाळा नांदगावकर, प्रदेश सरचिटणीस शालिनीताई ठाकरे, प्रदेश सरचिटणीस रिटाताई गुप्ता ,मनसे नेते अभिजीत पानसे, मनसे नेते जयप्रकाश बविस्कर, मनसे नेते नितीन सरदेसाई,वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक,सरचिटणीस राजाभाऊ चौगुले,ऋषी शेरेकर, वसंत फडके, मुंबई सहकार बोर्ड चे सचिव श्रीधर जगताप, उपाध्यक्ष राजू उंबरकर, नगरसेवक संजय तुरडे,बंटी म्हशीलकर, सत्यवान दळवी,यांनी उपस्तीत राहून मार्गदर्शन केले,,या शिबिराला उपस्थित असलेल्या महाराष्ट्र सैनिकांना ‘वित्तीय सहकारी संस्था’ या विषयावर श्री. विश्वास उटगी तसंच श्री. जयंत गांगण यांनी, ‘गृहनिर्माण सहकारी संस्थां’बाबत श्री. विनोद सोनवणे यांनी, ‘सहकारातून राजकारण- समाजकारण आणि कार्यकर्ता निर्मिती’ यावर श्री. राम पटवर्धन यांनी, ‘सहकारातून रोजगार निर्मिती’बाबत श्री. प्रकाश मोहिते यांनी आणि ‘सहकारी संस्था व्यवस्थापन- कार्यप्रणाली’बाबत श्री. अनंत बोंबले यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष व पक्षाचे नेते श्री. दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या शिबिरास अनेक वरिष्ठ पदाधिकारी,सहकार सेनेचे सर्व पदाधिकारी, स्थानिक मनसेचे विभाग अध्यक्ष अनिल येवले, महिला विभाग अध्यक्ष शलाका हरियाण , आवर्जून उपस्थित होते. ‘भविष्यात पक्षाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात दमदार कामगिरी करण्यासाठी अशा प्रशिक्षण शिबिरांचा निश्चितच लाभ होईल’ असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button