Chandwad

चांदवड नगरपरिषद संचलित वाचनालय परिसरात स्वच्छता विभागाकडून साफसफाई

चांदवड नगरपरिषद संचलित वाचनालय परिसरात स्वच्छता विभागाकडून साफसफाई

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड घोडकेनगर गुरुकुल कॉलनी यांच्या मध्यातच वाचनालय व अभ्यासिका स्थित आहे. सध्या MPSC,पोलीस भरती,आरोग्य भरतीची परीक्षा असल्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी व विद्यार्थीनी येथे अभ्यास करणेसाठी येत असतात.मात्र अभ्यासिकेजवळील रस्त्यावर खड्डे पडलेले होते व परिसरात मोठे गवत व अस्वच्छता पसरलेली होती.दोन वेळा सर्पराजाचे सुद्धा दर्शन झाले.अभ्यासिकेतील विद्यार्थी ,नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्री शांताराम घुले यांनी ही बाब लक्षात आणून देताच मुख्याधिकारी श्री अभिजित कदम व स्वच्छता विभाग अभियंता श्री सत्यवान गायकवाड साहेब यांनी तातडीने दखल घेऊन स्वच्छता विभागाची कर्मचारी,पर्यवेक्षक यांना तातडीने परिसर स्वच्छ करणे बाबत सूचना केल्या व कार्यवाही सुरू झाली. डासांचे प्रमाण वाढल्याने त्या परिसरात धुरळणी सुद्धा करण्यात आली व कटर मशीनने गवत स्वच्छ करण्यात आले. विद्यार्थ्यांनी झालेल्या कामाबद्दल अधिकारी व कर्मचारी यांचे धन्यवाद मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button