Aurangabad

सावखेडगंगा येथे २५० को-वॅक्सीन चे लसीकरण नागरिकांना देण्यात आले…

सावखेडगंगा येथे २५० को-वॅक्सीन चे लसीकरण नागरिकांना देण्यात आले…

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : सध्या कोरोना महामारीने डोके वर काढले आहे. या महामारीने लाखो नागरिकांचा जिव घेतला आहे. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी को-वॅक्सीनचे लसीकरण करण्यात आले आहे. सावखेडगंगा या गावासाठी २५० लस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. वैजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार प्रा. रमेश पा. बोरनारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब पा. जगताप यांनी को-वॅक्सीन लसीकरणासाठी विशेष सहकार्य केले आहे. सावखेडगंगा येथे २५० लस उपलब्ध झाल्या होत्या. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले तसेच मास्क व सेनिटायझर चा वापर करून लसीकरण शांततेत पार पडले.

या लसीकरणासाठी सावखेडगंगा येथील ओबीसी महिला सरपंच सौ. ज्योतीताई भाऊसाहेब ढेंबरे. उपसरपंच सुनिल भिवराव पवार तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य. ग्रामपंचायत कर्मचारी सुंदर खटाणे. वैद्यकीय अधिकारी श्रीमती हजारी मॅडाम. आरोग्य सहाय्यक श्री आर. डी. नन्नावरे. आरोग्य सेवक श्री एम. डी. गायकवाड. श्री एम. टी. शिरसाठ. श्री आर. बी. थोरात. वैद्यकीय सेविका श्रीमती के. आर. जगदाळे. बी. एफ. श्रीमती के. व्ही. इंगळे. शिक्षक श्री दिपक पवार. श्री मुकुंद पाटनकर. आशा सेविका श्रीमती एल. आर. नाटकर. एस. ए. तुपे. यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button