Amalner

अमळनेर येथिल कलागुरु ड्रीमसिटी नगर मधील नागरिकांनी कोविड सेवाभावी कार्य करणाऱ्या डॉ सुरेश खैरनार आणि वृक्षारोपण- वृक्षसंवर्धन-वृक्ष संरक्षण करून परिसर हिरवागार करणारे भास्करराव शिंदे यांच्या सामाजिक सेवाभावी कार्याची दखल

अमळनेर येथिल कलागुरु ड्रीमसिटी नगर मधील नागरिकांनी कोविड सेवाभावी कार्य करणाऱ्या डॉ सुरेश खैरनार आणि वृक्षारोपण- वृक्षसंवर्धन-वृक्ष संरक्षण करून परिसर हिरवागार करणारे भास्करराव शिंदे यांच्या सामाजिक सेवाभावी कार्याची दखल

अमळनेर : अमळनेर येथिल कलागुरु ड्रीमसिटी नगर मधील नागरिकांनी कोविड सेवाभावी कार्य करणाऱ्या डॉ सुरेश खैरनार आणि वृक्षारोपण- वृक्षसंवर्धन-वृक्ष संरक्षण करून परिसर हिरवागार करणारे भास्करराव शिंदे यांच्या सामाजिक सेवाभावी कार्याची दखल घेत समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते नागरी सत्कार कलागुरु ड्रीमसिटी येथे नुकताच संपन्न झाला.
कलागुरु ड्रीमसिटी परिसरातील रहिवासी असलेले डॉ सुरेश खैरनार यांनी कोविड 19 मध्ये करोना रुग्णांना अहोरात्र परिश्रमपूर्वक सेवा दिल्यात, बऱ्याच रुग्णांना विशेषतः वृद्धांना घरी जाऊन धिर देत मानवता जपत सेवा दिली तर अनेक रुग्णांचे प्राण वाचविलेले आहे. तसेच आर के नगर व कलागुरु परिसरातील रहिवासी असलेले सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी मागील काही वर्षांपासून ड्रीमसीटी परिसरात अनेक झाडे लावलीत, नुसती लावली नाही तर त्यांना नियमितपणे पाणी टाकणे, त्यांची निगा राखणे,त्यांना लोखंडी जाळ्या लावणे ,काटेरी कुपन करणे वृक्षारोपण-वृक्षसंरक्षण- वृक्षसंवर्धनाचे सोबतच अबालवृंद्धा साठी असलेल्या परिसरातील गार्डन ची स्वच्छता स्वतः करणे,परिसरात असलेल्या व्यायम शाळेची दुरुस्ती आदी कामे कोणाचीही मदत न घेता कुणाकडून ही आर्थिक मदत न घेता निस्वार्थ पणे करीत आहे.शिंदे यांच्या या पर्यावरण संवर्धनासह सातत्याने सुरू असलेल्या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून यावेळी शाल श्रीफळ गौरवपत्र,पुष्पहार व श्रीविठ्ठल मूर्ती देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प स सभापती श्याम अहिरे यांचेसह उपस्थित प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा सभापती प्रफुल्ल पवार,
भाजप तालुका अध्यक्ष हिरालाल दादा पाटील,शहर अध्यक्ष उमेश वाल्हे, सात्रीचे सरपंच महेंद्र बोरसे आदींच्या हस्ते सामूहिकपणे सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी मा.आ.स्मिताताई वाघ यांनीही दूरध्वनीवरून सत्कारमूर्तींना शुभेच्छा व्यक्त केल्यात.
यावेळी सत्कारमूर्ती यांच्या कार्याचा परिचय अविनाश पाटील, एस टी पाटील, दिनेश सावळे यांनी त्यांच्या मनोगतात अनुभव मांडत करून दिला.यावेळी भाजप पदाधिकारी जिजाबराव आसाराम पाटील ,राहुल पाटील ,ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष व आरोग्यदूत शिवाजी पाटील, गोकुळ अहिरराव, मा.सरपंच संजय माधवराव पाटिल,रवींद्र पाटील , किर्तीलाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.तर ड्रीमसीटी परिवारातील रहिवासी गुलाब वाघ व सौ गिरीजा गुलाब वाघ, विश्वास बोरसे यांनीही सत्कारमूर्तींचा सत्कार केला. ड्रीमसिटी नगरचे जेष्ठ मार्गदर्शक रहिवासी असलेले श्रीनिवास मोरे यांची अमळनेर तालुका रेल्वे समितीवर निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्यासह ड्रीमसीटी परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात श्याम अहिरे म्हणाले की करोना काळात भयावह अश्या परिस्थितीत डॉ खैरनार यांनी केलेली रुग्ण सेवा अनमोल आहे! सोबतच परिसर स्वछता आणि वृक्ष लागवड व संवर्धन करणेसह परिसरातील स्वच्छता राखण्याचे भास्कर शिंदे यांचे कार्य हे अनमोल आहे! कलागुरु कॉलनी कडे येण्या-जाण्याच्या रस्त्याची फार दुरवस्था झाली आहे लवकरच आम्ही हा प्रश्न नगरपालिका किंवा खासदार निधीतून मार्गी लावू !असे आश्वासन यावेळी दिले. हिरालाल पाटील यांनीही भाषणात सत्कारमूर्तींबाबत गौरवोद्गार काढले.प्रमुख पाहुणे ओळख परिचय तसेच सूत्रसंचालन विक्रम शिंदे,यांनी केले तर कार्यक्रम प्रस्तावना श्रीनिवास मोरे यांनी मांडली.आभार प्रदर्शन दिनेश साळवे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सी वाय पाटील , उमेश सोनवणे यासह कलागुरु ड्रीमसीटी परिसरातील नागरीकांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Back to top button