Amalner

पिंपळे नाल्यावर अतिक्रमण करून नैसर्गिक नाला बुजल्यामुळे नागरिकांना  होतोय त्रास…घरात घुसले पाणी..संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी…

पिंपळे नाल्यावर अतिक्रमण करून नैसर्गिक नाला बुजल्यामुळे नागरिकांना होतोय त्रास…घरात घुसले पाणी..संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी…

पिंपळे रस्त्यालगतचा गट नं.१५१२ ला लागून असलेल्या नैसर्गिक नाला बुजल्या संदर्भात तक्रार व मामलेदार कोर्ट अॅक्ट-१९०६ प्रमाणे कायदेशीर कार्यवाही होणे संदर्भात..

अमळनेर नागरीक हितासाठी आपणास तक्रार देणे क्रमप्राप्त समजतो ते येणेप्रमाणे१) मे. पिंपळे रस्तालगत गट क्र.१५१२ ला लागून नैसर्गिक नाला आहे त्यात काही व्यवसायिकानी स्वत:च्या हितासाठी मलबा व मुरूम टाकून नाला बुजून वाहते पाणी अडविले असून स्वत:ची टुमदार दुकाने बांधली आहेत. त्यामुळे तेथील कॅशमेंट एरियातील पावसाचे वाहते पाणी हे अडविले गेले असून तेथील नागरिकांना प्रचंड असा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावर कुणीही बोलायला व तक्रार द्यायला पुढे येणे टाळत आहे. कारण कि, ज्या लोकांनी नैसर्गिक नाला बुजण्याचे कृत्य केले आहे ते कुबेराशी स्पर्धा करणारे असून त्यांची प्रचंड दहशत त्या
भागात असल्याने नागरिक यावर बोलायला धजावत आहेत.
आपणास मामलेदार कोर्ट अॅक्ट-१९०६ प्रमाणे संबंधित व्यक्तींवर चौकशी करून दंडात्मक कार्यवाही करावी ही नागरिक हितास्तव नम्र विनंती.
मे. मुख्याधिकारी सो. नगरपरिषद यांना विनंती कि, बांधकाम अभियंता यांनी गट क्र.१५१२/९ यावर व्यवसायिक बांधकामास परवानगी देतांना वाहत्या नाल्या संदर्भात बांधकाम कास नैसर्गिक नाल्या संदर्भातील नियम व अटी घालून द्यायला हव्या आहे. त्यांनी वेळोवेळी केल्या गेलेल्या बांधकामाचे परीक्षण नियम व अटी प्रमाणे केले नसल्याने आज पिंपळे रस्त्या लगतच्या रहिवाश्यांची अतीवृष्टी मुळे घरात पाणी जाणे, तसेच रस्त्यावर पाणी आल्या कारणाने रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. ही बाब गंभीर असून बांधकाम परवानगी देणाऱ्या अभियंता यांनी कुठल्या अटी शर्तीने बांधकामास परवानगी दिली याबाबतची चौकशी होणे गरजेचे आहे.
वरील तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन ज्या व्यावसायिकांनी मुरूम व मलबा
टाकून नैसर्गिक नाल्याची हानी केली त्यावर १९०६ मामलेदार कोर्ट अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करणे तसेच वाहता नैसर्गिक नाला पूर्ववत करणे हे अगत्याचे आहे. तरी वरील तक्रारीची नागरिक हितास्तव आपण तत्काळ दखल घेणार अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button