Amalner

जैव विविधता प्रकरण… साने गुरुजी फाउंडेशन ची गटविकास अधिकारी यांच्या विरुद्ध तक्रार…

जैव विविधता प्रकरण…
साने गुरुजी फाउंडेशन ची गटविकास अधिकारी यांच्या विरुद्ध तक्रार…
लेखी माफी न मागितल्यास गुन्हा दाखल करणार

अमळनेर

अमळनेर पंचायत समिती तर्फे जैव विविधता योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक संस्थेला एका गावाचे 40 हजार रु मिळणार आहेत. अमळनेर पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकारी यांनी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता आपल्या मना ला वाटेल आणि जवळच्या राजकीय प्रभावाखाली संस्थांची यादी जाहीर केली आहे. गटविकास अधिकारी हलक्या कानाचे असून कोणी काही सांगितले की तेच शब्द बोलतात आणि कृती करतात.
साने गुरुजी फाऊंडेशन चे सुरुवातीला जैव विविधता सर्वे यादीत नाव होते परंतु हलक्या कानाच्या गटविकास अधिकारी यांनी त्यांचे नाव आता यादीतून वगळले आहे.
यादीतून वागळताना ही संस्था काळ्या यादीत आहे आणि हरियली योजनेत सहभागी आहे असे कारण दिले परंतु या संस्थेचे अध्यक्ष यांनी संस्था काळ्या यादीत नसल्याचे आणि कोणतीही हरियली योजनेत सहभागी नसल्याने बदनामी केल्या प्रकरणी मा जिल्हाधिकारी, पंचायत समिती मुख्याधिकारी, आणि गटविकास अधिकारी यांना तक्रार अर्ज दाखल केला आहे आणि सर्व सोशल मीडियावर संस्था काळ्या यादीत समाविष्ट असल्याचे पत्र व्हायरल केल्या बद्दल लेखी माफी मागावी अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असे पत्र दिले आहे.
सध्या तरी जैव विविधता प्रकरणात खूप मोठ्या प्रमाणात भेदभाव केलेला दिसून येत आहे ज्या संस्थाना ही योजना दिली आहे त्यांची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.बोगस संस्थना योजना दिल्यास मोठया प्रमाणात भ्रष्टाचार या योजने अंतर्गत होणार असून कोट्यवधी रुपये शासनाचे या योजनेत खर्ची पडणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button