Chopda

चोपडा तालुक्याला वादळासह पावसाचा पुन्हा बसला तडाखा..

चोपडा तालुक्याला वादळासह पावसाचा पुन्हा बसला तडाखा..

प्रतिनिधी:रजनीकांत पाटील

चोपडा : शहरासह तालुक्यातील अनेर नदीच्या काठावरील अजंतीसीम, अनवर्दे, मोहिदा, दगडी, वढोदे, विटनेर या गावांना १८ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. त्यात पपई, केळी, कपाशीचे नुकसान झाले.

याच महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे वाळकी, मालखेडा, घोडगाव, अनवर्दे, मोहिदा, दगडी, वढोदे, विटनेर परिसरात मोठे नुकसान झाले होते. त्यात देखील केळीच्या बागा उद्धवस्त झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा १८ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अर्धा तास चाललेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनवर्दे, मोहिदा, दगडी, वढोदे या अनेर परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या केळी बागा, कपाशी या पिकांचे नुकसान झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button