Solapur

?️ भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली सडकून टीका..

भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली सडकून टीका..

महेंद्र साळुंके

सोलापूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला गेलाच आहात तर पुढे दिल्ली जा, म्हणजे निदान पंतप्रधान मोदी हे तरी बाहेर पडतील, असे म्हटले आहे. सोलापूरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. भाजप नेते शेतकऱ्यांना मदतनिधी जाहीर करत नसल्याचा आरोप केला आहे, असा सवाल यावेळी पत्रकारांनी विचारला असता, फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली.
राजकीय चिखलफेक करण्याची कुणालाही गरज नाही. महाराष्ट्रावर सध्या मोठे संकट कोसळले आहे.
पण, बिहारला विरोधी पक्ष नेते हे प्रचाराला जात आहे. बिहारला प्रचाराला गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आता पुढे जाऊन दिल्लीला जावे, जर दिल्लीला गेले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बाहेर पडतील, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
राज्याचे तुम्ही जबाबदार राजकारणी असल्यामुळे सध्या जनतेला फक्त दिलासा देण्याची वेळ आहे. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा जर स्वत:चे राज्य हे अडचणीत असेल तर राज्यासोबत एकत्र येऊन केंद्राकडून मदतीसाठी मागणी केली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले. केंद्र सरकार हे काही परदेशातील सरकार नाही. पक्षपात न करता सर्व राज्यांना मदत करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारवर आहे. शुक्रवारी माझ्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलले आहेत. त्यामुळे काही मदत लागल्यास हक्काने मागणार आहे आणि ती मदत ते दिल्याशिवाय राहणार नसल्याचे ठाकरे म्हणाले
सध्या शेतीचे पंचनामे सुरू आहेत, आढावा घेऊन मदत केली जाणार आहे. तुर्तास मृतांच्या नातेवाईकांना आज प्रतिनिधिक मदत दिली आहे. आतापर्यंत मागील सरकारकडून फक्त घोषणाबाजी करण्यात आली आहे. पण, आम्ही कोणतीही घोषणाबाजी न करता थेट मदत पुरवणार असल्याचे ठाकरे म्हणाले. हे संकट अजून टळलेले नाही. येत्या काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा वेधशाळेने दिल्यामुळे घाईगडबडीने काही केले जाणार आहे. सर्वांची काळजी घेण्याची गरज असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button