Jalgaon

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे अमळनेर पंचायत समितीच्या गैरकारभारविरुद्ध  जिल्हा परिषद जळगांव निवेदन सादर

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे अमळनेर पंचायत समितीच्या गैरकारभारविरुद्ध जिल्हा परिषद जळगांव निवेदन सादर

अमळनेर पंचायत समिती, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी अनिल राणे, लोटन चिंचोले, व ग्रामसेवक महेश ठाकूर यांच्या मनमानी कारभार, भ्रष्टाचार व हुकुमशाही कारभार, कायम सेटलमेंट करणारे व महिला ना मानसिक व शारीरिक त्रास देणारे व जातीवाचक शिवीगाळ देणारे… असे भ्रष्ट विस्तार अधिकारी यांची ९ ऑगस्ट( क्रांती दिन ) पर्यंत बदली झाली नाही, तर छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य सामूहिक आत्मदहन करणार असे निवेदन पत्र जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. पंकज आशिया साहेब यांना निवेदन देण्यात आले… तर जिल्हा परिषद अध्यक्ष मा.ना.सौ. रंजना ताई पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. लालचंद पाटील यांच्या सोबत निवेदन देऊन चर्चा केली आहे…

सामान्य प्रशासन विभाग चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे व ग्राम पंचायत विभाग चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे…यांना जाहीर इशारा व पोलखोल यंत्रणा ची माहिती देऊन चर्चा केली आहे… बाळासाहेब बोटे यांनी लवकरात लवकर पूर्ण विचार करून निर्णय घेतला तर त्याचा फायदा आहे…नाही तर छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र मध्ये काय करू शकते..हा एकदा इतिहास तपासा…खूप अधिकारी चुकीचे कामे केली मूळ त्याची सेवा, पेशन साठी त्रास झाला आहे… मा. हायकोर्ट मध्ये तुमचा विरोधी याचिका पीटिशन दाखल होणार त्याचा करता…तुम्ही विचार करा… भ्रष्ट विस्तार अधिकारी व कर्मचारी यांना जवळ करू नका… त्याची बदली करा. हा लढा फार भयानक परिस्थिती निर्माण करणार आहे…९ ऑगस्ट क्रांती दिवस दाखवून देवू…

जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया साहेब यांच्या सोबत साधारण ४०/४५ मिनिटे सर्व काही विषयावर चर्चा केली आहे.जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया साहेब यांच्या सत्कार व जळगाव जिल्हा मध्ये स्वागत करण्यात आले आहे. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया साहेब यांच्या सोबत चर्चा करताना व निवेदन देताना…छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे कायदेशीर सल्लागार व महासचिव adv. अलका मोरे पाटील व सोशल मीडिया प्रमुख सोनल वालझाडे व हिरामण पाटील व अर्थव पगार उपस्थित होते…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button