Nashik

इंपिरिकल डाटा मिळवण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करणार- छगन भुजबळ. ओबीसी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री छगन भुजबळ यांची भेट.

इंपिरिकल डाटा मिळवण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करणार- छगन भुजबळ. ओबीसी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री छगन भुजबळ यांची भेट.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक ; इंपिरिकल डाटा मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज मुंबईत राज्यातील विविध ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्री भुजबळ म्हणाले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. ओबीसी समाजाला आरक्षण हे मोठ्या संघर्षानंतर मिळाले आहे. आम्ही अगदी मंडल आयोगाच्या अंमलबजावणी पासून संघर्ष केला आहे. समता परिषद सुरवातीपासूनच कायदेशीर लढाई लढत आहे. आता गेलेलं राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

ओबीसींची जनगणना करण्यासाठी आज अनेक लोक एकत्र येत आहेत. मात्र हीच भूमिका आम्ही गेले अनेक वर्षे मांडत आहोत. समता परिषदेच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. केंद्रीय पातळीवर अनेक पक्ष एकत्रित येऊन आता ही मागणी करत असल्याचे समाधान आहे. कारण मागासवर्गीयांची चळवळ जिवंत राहिली पाहिजे असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

यावेळी भेटीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री भुजबळ म्हणाले की ओबीसी समाज नेमका काय आहे, आरक्षणाचा नेमका तिढा काय आहे. यासाठी राज्यभर छोट्या छोट्या सभा घेऊन प्रा.हरी नरके, उत्तम कांबळे, प्रा रावसाहेब कसबे हे लोकांना मार्गदर्शन करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन हा प्रश्न लोकांना समजावून सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी ओबीसी समाजासाठी एकत्र काम करणे गरजेचे आहे.

या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, किरण झोडगे,दत्तात्रय माळी, लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे , मातंग समाज आरक्षण समितीचे नारायण गालफाडे, जनहित संघर्ष सेनेचे सोमनाथ शिंदे, होलार समाज समन्वय समितीचे राजाराम ऐवाळे, सूरेश कांबळे, बाळासाहेब बंडगर, गणपत देवकाते, जगन्नाथ जानकर , परमेश्वर कोळेकर,बाळासाहेब करगळ आणि ओबीसी समाजाच्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button