Lonand

चव्हाणवाडीच्या तरुणीचे एमपीएससी परिक्षेत उज्वल यश. कुठल्याही क्लासविना शेतकरी कन्या पीएसआय साठी पात्र

चव्हाणवाडीच्या तरुणीचे एमपीएससी परिक्षेत उज्वल यश.

कुठल्याही क्लासविना शेतकरी कन्या पीएसआय साठी पात्र

लोणंद प्रतिनिधी दिलीप वाघमारे

फलटण तालुक्यातील चव्हाणवाडी येथील शेतकरी कन्या प्रियांका अविनाश चव्हाण यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी परिक्षेत चांगले गुण मिळवून पीएसआय पदाला गवसणी घातली.

चव्हाणवाडी सारख्या खेड्यातून अतिशय खडतर परिस्थितीतून शिक्षण मिळवत , तसेच कुठल्याही कोचिंग क्लासेस ला न जाता स्वअध्ययन करत हे यश प्रियांका चव्हाण यांनी मिळवले आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चव्हाणवाडी येथील शाळेत झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण लोणंद येथील शाळेत झाले आहे. पुणे येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथून त्यांनी कृषि पदवी प्राप्त केली आहे. आई वडिलांच्या लहानपणापासून शिक्षणासाठी मिळालेले प्रोत्साहन आणि भक्कम पाठिंब्याच्या जोरावर हे यश मिळाल्याचे प्रियांका यांनी सांगितले. अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन त्यांनी हे यश संपादन केल्या बद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button