Maharashtra

चांदवडला शहर सुरक्षा समिती सज्ज

चांदवडला शहर सुरक्षा समिती सज्ज

प्रतिनिधी उदय वायकोळे

आज दि 18 जून 2020 रोजी आणखी 2 रुग्ण चांदवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने प्रशासन मात्र सज्ज झाले आहे. चांदवड शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यापैकी एक कोरोना योद्धा आहे.सदर 25 वर्षीय व्यक्तीने एकदा कोविड सेंटर ला ड्युटी करून दुसऱ्या वेळी कर्तव्यावर असताना त्रास जाणवू लागल्याने तपासणी करून घेतली होती.
मा प्रांताधिकारी श्री सिद्धार्थ भंडारे यांचे आदेशानेे 10 जून रोजी स्थापन झालेली चांदवड शहर सुरक्षा समिती आजपासून नगरपरिषद हद्दीतील वॉर्डात आढावा घेताना दिसत आहे.या समितीत अध्यक्ष- नगरसेवक,सदस्य-नगरपरिषद कर्मचारी-शिक्षक,शिक्षिका,आशा/अंगणवाडी सेविका आहेत. प्रत्येक वॉर्डाची स्वतंत्र समिती असून आज सकाळपासून समिती अध्यक्ष व सदस्य अतिशय बारकाईने बाहेरून कोणी आल्याचे,किंवा आजारी असल्याची विचारपूस करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी चांदवड कोरोनामुक्त झाले होते तसेच आताही झाले पाहिजे त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल नगरसेवक श्री नवनाथ आहेर,अल्ताफ तांबोळी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button