Chandwad

चांदवड ट्रेकर्स ग्रुप सदस्य प्रकाशभाऊ सूर्यवंशी यांचा वाढदिवस अणकाई किल्ल्यावर अनोख्या पद्धतीने साजरा

चांदवड ट्रेकर्स ग्रुप सदस्य प्रकाशभाऊ सूर्यवंशी यांचा वाढदिवस अणकाई किल्ल्यावर अनोख्या पद्धतीने साजरा

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड शहरातील चांदवड ट्रेकर्स ग्रुप प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवस दिवशी एक किल्ला निवडून तेथील ट्रेकिंग करून साजरा करीत असतो.असेच ग्रुपचे सदस्य व जंगल परिसरातील रानमेव्याची माहिती असणारे श्री प्रकाशभाऊ सूर्यवंशी यांचा वाढदिवस अनकाई किल्ल्यावर अनोख्या पद्धतीने आज साजरा करण्यात आला. यावेळी अगस्ती ऋषी मंदिर दर्शन, टनकाई किल्ल्यावरील महादेव मंदिरात आरती करण्यात आली.डोंगर किल्ले यांचे जतन केले पाहिजे असाही संदेश यावेळी सोशल मिडियाद्वारे देण्यात आला.
सध्या अनकाई व टनकाई किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात डागडुजी व दुरुस्ती सुरू असून पुरातत्व विभागातर्फे अनुदान मिळून किल्ल्याचा संरक्षक भिंती,बुरुज याची डागडुजी सुरू आहे.
अनेक पर्यटक सदर किल्ला पाहण्यासाठी येत असून कोणीही प्लास्टिक कचरा करू नये,निसर्ग व किल्ल्याचे विद्रुपीकरण करू नये,कोठही रेखाटू नये असा संदेश बालकवर्ग पर्यटकांना देत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button