Chandwad

चांदवडला सोमवारचा आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद

चांदवडला सोमवारचा आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड शहरात भरणारा आठवडे बाजार 08/03/2021 पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याचे चांदवडचे मुख्याधिकारी श्री अभिजित कदम यांनी लेखी सुचनेद्वारे कळविले आहे.
याबाबत मुख्याधिकारी यांनी कळविले आहे की मा जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार 5 पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई आहे. विवाहासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई आहे. सूचनांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button