Chandwad

प्रा. डॉ. जी. डी. शिंदे यांच्या यशस्वी सायकलवारी बद्दल चांदवड दुर्गभ्रमंती मंडळातर्फे सन्मान

प्रा. डॉ. जी. डी. शिंदे यांच्या यशस्वी सायकलवारी बद्दल चांदवड दुर्गभ्रमंती मंडळातर्फे सन्मान

उदय वायकोळे चांदवड

चांदवड येथिल प्रा. डॉ. जी. डी. शिंदे यांनी नाशिक ते पंढरपूर सायकलवारी यशस्वीपणे पार पाडली , त्यांच्या या विठ्ठल भक्ती व समाजप्रबोधन वारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.श्री शिंदे हे चांदवड दुर्गभ्रमंती मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक असल्याने मंडळाच्या दुर्गभ्रमंती मित्रां तर्फे त्यांच्या यशस्वी कामगिरी बद्दल व कोरोना काळात जनजागृती आणि आरोग्याचा संदेश देण्याच्या स्तुत्य उपक्रमा बद्दल सन्मानपत्र , पुष्पगुच्छ , शाल , व संजय पाडवी यांनी रेखाटलेले श्री विठ्ठलाचे “रेघो” चित्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सायकलवारी बद्दल प्रा. शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व चांदवड दुर्गभ्रमंती मंडळाच्या वतीने भविष्यात देखील अशा सायकलवारीचे आयोजनाचा मानस त्यांनी व्यक्त केला व सन्माना बद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री प्रशांत सुताने सर , विनोद बो-हाडे , ग्रामसेवक प्रकाश सुर्यवंशी , संतोष सोनवणे , प्रा. उदय वायकोळे , प्रा. शिक्षक प्रफुल्ल सोनवणे , छायाचित्रकार अनिल राऊत , चित्रकार संजय पाडवी , क्रिष्णा शिंदे ,साई सुर्यवंशी, बाल दुर्गभ्रमंतीकार विशु सोनवणे व राम शिंदे आदी चांदवड दुर्गभ्रमंती मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button