Chandwad

चांदवडच्या कलावंतांनी *देवीचा गोंधळ* गाणे यु ट्यूब वर केले प्रदर्शित

चांदवडच्या कलावंतांनी *देवीचा गोंधळ* गाणे यु ट्यूब वर केले प्रदर्शित

चांदवड-उदय वायकोळे

चांदवड- नवरात्रीच्या निमित्ताने चांदवड जि नाशिक येथील भगवा झेंडा फेम गायक योगेश भास्कर खंदारे यांनी देवीचा गोंधळ या गीताची निर्मिती केली आहे. चांदवडचे सुप्रसिद्ध गीतकार विष्णू थोरे यांनी हे गीत लिहिले असून निलेश गरुड यांनी या गीताचे संगीत संयोजन केले आहे. चांदवडचे पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या हस्ते लॅपटॉप ची की दाबून चांदवडच्या रेणुका देवी मंदिरात हे गीत नुकतेच लॉन्च करण्यात आले असून यु ट्यूब च्या स्वरभास्कर म्युझिक कंपनी या चॅनलवर पेजवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले.
यावेळी चांदवडचे चांदवड सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत,नगरसेवक जगन्नाथ राऊत, रेणुका देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुभाष पवार, गायक संगीतकार योगेश खंदारे, गीतकार कवी विष्णू थोरे संतोष देवरे, राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश शेळके,महेश खंदारे, संजय पाडवी,रुपेश पवार, धनंजय पाटील, पिंटू राऊत,गणेश जगताप, रविंद्र खंदारे,किशोर जगताप, नारायण कुमावत,भाऊ गुरु वैद्य,हरी कासव आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button