Pune

चांडोली खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे जिल्हात सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत

चांडोली खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे जिल्हात सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत

पुणे : प्रतिनिधी दिलीप आंबवणे

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चांडोली खुर्द तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी चे सात विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत पात्र ठरले. साई संतोष इंदोरे, लावण्या राहुल आनंदराव , संस्कृती तुकाराम वाबळे, सोहम हेमंत गांजाळे, ओम संतोष इंदोरे, आर्या चंद्रकांत कुरकुटे, श्रावणी रविकिरण डोंगरे हे विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले. या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती साधना दत्तात्रय सांडभोर यांनी कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण चालूच ठेवले. त्यामुळेच प्रथमच चांडोली शाळेतील सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे .
या प्रसंगी समस्त ग्रामस्थ चांडोली खु॥ सर्व सहकारी शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर इंदोरे, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, केंद्रप्रमुख मनोहर सांगळे,गजानन पुरी, विस्तार अधिकारी संचिता अभंग, गटशिक्षणधिकारी संजय नाईकडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका यांचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button