BuldhanaMaharashtra

प्रयत्नांना वयाचे बंधन नसते, जिंकणे हे चिरतरुण आहे – लता करे दिव्या फांउडेशनचा ‘उडान नारी शक्तीची’ कार्यगौरव सोहळा

प्रयत्नांना वयाचे बंधन नसते, जिंकणे हे चिरतरुण आहे – लता करे
दिव्या फांउडेशनचा ‘उडान नारी शक्तीची’ कार्यगौरव सोहळा

बुलडाणा राजेश सोनुने

‘मी काल ही संघर्ष केला, आजही माझा संघर्ष सुरु आहे आणि पुढे ही माज्या
जीवनात संघर्ष सुरु राहणार आहे. प्रयत्नांना वयाचे कोणतेही बंधन नसते
यामुळे जिंकणे चिरतरुण आहे”.असे सांगणारे लता भगवान करे – एक संघर्ष
गाथा’ या आगामी मराठी चित्रपटाचा प्रेरणादायी चित्रपट आगामी महीन्यात सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याचे सांगत लता करे यांनी दिव्या फाउंडेशनचा सन्मान स्विकारला. ८ मार्चला जागतिक माहिला दिना निमित्त कर्तबगार
यशसिनींचा ‘उडान नारी शक्तीची’ कार्यगौरव सोहळा येथील गर्देवाचनालयाच्या
सभागृहात आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रात उडान भरणाऱ्या
यशस्विनींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. ‘उडान नारी शक्तीची’ या सोहळ्याची सुरुवात वयाच्या ६५ व्या नऊवारी
साडीमध्ये धावत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाºया लता करे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून संविधानाचे पूजन व वटवृक्षाला पाणी टाकून झाडे लावा झाडे
जगवाचा संदेश देत कार्यक्रमाला पारंभ झाला. चला हवा येऊ द्या फेम चैताली मानकर, स्वागताध्यक्षा डॉ. वैशाली निकम, मिस वेअर इंडिया, डॉ.प्रचिती पूंडे, अरुण जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. या चैताली मानकर, समाजसेविका ललिता खडसे, अ‍ॅड. वृषाली बोंद्रे, अ‍ॅड. जयश्री शेळके, देवमृत फाऊंडेशनच्या प्रिया जाधव, वैशाली झाल्टे, प्रा.डॉ. मिनल
गावंडे, अनिता खूमकर, सुनिता उबाळे, डॉ. शिल्पा दंदाले, अ‍ॅड. वर्षा पालकर, कोकीळा तोमर, अमिता कदम, नर्मदा जाधव, अ‍ॅड. राधीका गणोजेकर आदींचा सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी
दिव्या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे भूमीका मांडतांना म्हणाले की, राज्यभरात दिव्या फाऊंडेशन विविध क्षेत्रात निराधार व गरजूंसाठी कार्यरत असून या सेवाकार्याला नारीशक्तीचे आणखी बळ लाभाऱ्यास विशेष करुन महिलांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला. तर डॉ. प्रचिती पुंडे यांनी बोलताना सांगितले राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले किरण बेदी यांच्यासारखे विचार
डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारांची शक्ती अगर आपल्या विचारांमध्ये आणली तर आपण आपली स्वत:ची शक्ती बळ निर्माण शकते असे प्रतिपादन डॉ. पुंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्षा डॉ. वैशाली निकम, ह्या होत्या कार्यक्रमची प्रास्ताविक किरण डोंगरदिवे यांनी केले.

संचालनाची धूरा राजमती ठेंग यांनी साभाळली. अशोक काकडे यांनी आभार
मानले. या कार्यक्रमासाठी महिलांनी विशेष सहभाग घेतला यशस्वी रिते काम
करणाऱ्याआयोजक गुंजन खडसे डॉ.वैशाली निकम, आशिष खडसे,डॉ. गजेंद्र निकम,कोकिळा तोमर, डॉ.नंदीनी रिंढे, मीना जगताप, अनिता कापरे, मंगेश ठाकरे,
विद्या वानखेडे, संगीता राजपूत, गुंजन खडसे, सुनिल तिजारे, कोमल ठाकरे, आत्माराम झाल्टे, युवराज कापरे, रंजना कायस्थ, डॉ.नंदीनी रिंढे, मीना जगताप, गौतम अंभोरे, अनिता कापरे, विद्या वानखेडे, सोमु कायस्थ, संगीता राजपूत, राजेंद्र टिकार, चंद्रकुमार बहेकर, भुषण वाठोरे, अमोल बिबे, सुनील गवई, रूपाली गवई, निलेश शिंदे, संदीप चंदन, गजानन अवसरमोल, मिलिंद
चिंचोळकर, राजेंद्र मोरे, युवराज कापरे, वैशाली पवार, श्वेता माळी, विपीन कोलते, महेंद्र मोरे, सिद्धार्थ आरख, मोहसीन, सचिन फुंडे, ज्योती गवई, नीता पैठणे, सुमित तायडे, पांडुरंग राऊत, सुधाकर मानवतकर, शैलेश खेडकर
यांच्यासह दिव्या फाऊंडेशनच्या सदस्यांनी पूढाकार घेतला.
असा झाला कार्यगौरव…
राष्ट्रमाता जिजाऊ, जिजाऊ कन्या शूरतेजस्वनी हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्काराच्या मानकरी लता करे, डॉ. प्रचिती पुंडे, अ‍ॅड.वृषली बोंद्रे, डॉ.शिल्प दांदले, माधुली बारणे
पुणे, प्रा.डॉ.मीनल गावंडे या होत्या जिजाऊ कन्या पुरस्कारासाठी मानकरी अमित कदम मुंबई, शिवकन्या सुरडकर धाड, चैताली मानकर जळगाव जामोद खान्देश,तसेच
शूरतेजस्वनी पुरस्कार च्या मानकरी, प्रा जयश्री दाभाडे,अमळनेर खान्देश ,अँड. वर्षा पालकर, राजमती ठेग गोदिया, अँड.उज्वला कस्तुरे, सीमा पखाले शिक्षक, तर घरकाम करणाऱ्या कष्टकरी
महिलांनाही यावेळी गौरविण्यात आले. त्यामध्ये विशेष सत्कार महिलांच्या विषयावर लेखन करणारे साहित्यिक कवी किरण डोंगरदिवे सर त्यांच्या लेखणीचा ही सन्मान करण्यात आला, तसेच पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अरुण जैन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दिव्या फाउंडेशनने दत्तक घेतलेल्या मुली
सुध्दा कार्यक्रम ला उपस्थित होत्या. त्यापैकी निकिता पवार हीने राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांचे विचार
व्यक्त केले. या प्रेरक विचारासाठी डॉ. प्रचिती पुंडे यांनी निकिताला स्वत:च्या हातातली अंगठी सुद्धा भेट दिली. रांगोळी बघण्यासारखी असल्याने
कार्यक्रमात आलेल्या महिलांचा प्रतिसाद हा रांगोळीकडे आकर्षित होत सक्रीय
होतात. जिजाऊ सृष्टीचा किल्ला हीसुद्धा विशेष आकर्षण होते. कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानवंदना देऊन करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button