Aurangabad

वैजापूरात साखळी उपोषणामुळे अधिकारी, राजकीय पुढारी यांच्यासह कंत्राटदारांचे धाबे दणाणले

वैजापूरात साखळी उपोषणामुळे अधिकारी, राजकीय पुढारी यांच्यासह कंत्राटदारांचे धाबे दणाणले

औरंगाबाद :- गणेश ढेंबरे

वैजापूर तालुक्यात सध्या तालुका कृती समितीच्या वतीने तालुक्यातील सर्वच खराब रस्ते या महत्वपूर्ण प्रश्नावर तहसिल कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला तालुक्यातील जबाबदार तरूण बसलेले आहे. तालुक्यातील काही तरूणांनी महात्मा गांधी व आण्णा हजारे यांचा आदर्श घेवून शातंतेच्या मार्गाने वैजापूर तालुका कृती समितीद्वारे उपोषणाच्या माध्यमातून तालुक्यातील रस्त्यांचे प्रश्न हाती घेतले आहे. वैजापूर तालुक्यातील सर्वच यंत्रणेच्या अधिपत्याखालील सर्वच रस्ते अतिशय खराब झालेले आहेत. एकही रस्ता नागरिकांना चालण्यासाठी किंवा वाहनांना चालवण्यायोग्य राहिलेला नाही. तालुक्यातील सर्वच नागरिक यामुळे त्रस्त झाले असून नागरिकांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत. अनेक छोटे मोठे अपघात रोजच होत आहे. वाहनांचा दुरुस्ती खर्च वाढला असून दळणवळण व्यवस्था संपूर्णतः कोलमडली आहे. त्यामुळे कृती समितीचे पुढील मागण्या केलेल्या आहे. त्या अशा १)तालुक्यातील निविदा प्रक्रिया झालेल्या सर्वच कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात यावेत. २) ज्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया प्रलंबित आहेत. त्यांच्या निविदा प्रक्रिया तातडीने सुरु कराव्यात. ३) वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या कामांची लगोलग सुरुवात करावी. ४) रस्त्याशी संबंधित सर्वच यंत्रणांनी आपापली निश्चित जबाबदारी ओळखून आपापले रस्ते दुरुस्त करून घ्यावेत ५) ज्या रस्त्यांची कामे सुरु आहेत त्या सर्व कामांवर संबंधित अभियंत्यांनी प्रत्यक्ष हजर राहून सुयोग्य काम करून घ्यावे. ६) निकृष्ट दर्जाचे सर्वच रस्ता बांधकाम साहित्य रद्द करावे. ७) निकृष्ट दर्जाच्या कामांना नियमित करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित करावे. ८) निकृष्ट बांधकाम साहित्य वापरून रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. ९) तालुक्यातील सर्वच शिव रस्ते मोकळे करून शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी सहकार्य करावे. १०) तालुक्यातील सर्वच फरशी पुलांच्या ठिकाणी मोठे पूल बांधण्यात यावेत. ११) तालुक्यातील खराब झालेल्या सर्वच रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडुजी करण्यात यावी. १२) प्रत्येक रस्त्यास दोष निवारण कालावधीचे फलक लावण्यात यावे १३) तालुक्यातील सर्वच रस्त्याना किलोमीटर, रस्ता क्रमांक साखळी क्रमांक, रस्त्यांची देखभाल करणारी यंत्रणा, अधिकारी कर्मचारी यांचे नाव व संपर्क क्रमांक याबाबत फलक लावण्यात यावे. १४) वैजापूर तालुक्यातील सर्वच गावांचा शेतीमाल विक्रीसाठी लासुर स्टेशन या बाजार पेठेत जातो, मुंबई नागपुर महामार्गावरील टोल नाक्याचा भुर्दंड शेतकरी व वाहनधारक यांना सहन करावा लागतो. एक तर हा टोलनाका सध्याच्या ठिकानाहून स्थलांतरीत करावा किंवा शेतकऱ्यांच्या माल घेवून जाणाऱ्या वाहनधारकास टोल माफी देण्यात यावी.

या सर्व मागण्या प्रत्यक्ष वास्तवात येणार नाहीत तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील. हा जनतेचा आक्रोश असून याला सरकारने प्राथमिकता देऊन सर्व संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून वरील सर्वच कामे तात्काळ मार्गी लावावीत, यासाठी साखळी उपोषण आहे. आज या उपोषणाचा 15 वा दिवस असून या साखळी उपोषणामुळे तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांसह कंत्राटदारांचे ही धाबे दणाणले आहेत. हे उपोषण डाॅ. विपीन साळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूरला तहसिल कार्यालयासमोर सुरू आहे. तसेच उपोषणासाठी नारायणराव कवडे, गोकुळ सुराशे, ज्ञानेश्वर आदमणे, बाबा चन्ने, लक्ष्मण काळे, संदीप ठोंबरे, दामू पारिख, प्रविण सावंत, अशोक मतसागर, रामचंद्र पिल्दे, कैलास लोखंडे, आण्णा मतसागर हे तालुक्यातील जबाबदार नागरिक साखळी उपोषणाला बसलेले आहे.

प्रतिक्रिया :

१) वैजापूर तालुका कृती समितीच्या साखळी उपोषणाचा आजचा 13 वा दिवस 13 दिवस सामान्य नागरिक जनतेच्या हक्कासाठी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ एक आंदोलन करत आहेत. ज्या ज्या रस्त्याच्या कामासाठी शासन स्तरावरून निधी प्राप्त झालेला आहे. अशा एकाही रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही. कागदावर रस्ते की कागदावर निधी याची जनतेला उकल होईना, रस्त्याशी संबंधित अधिकारी आपल्याच तोऱ्यात मशगुल आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला तर अगदी सहजपणे केराची टोपली दाखवली आहे. तहसीलदार यांनी विस्तृत बैठक घेऊनही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कान, तोंड, डोळे बंदच आहेत. कदाचित या सर्व प्रकरणात मोठमोठी धेंडं, मोठमोठी गब्बर गडी. मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे हितसंबंध अडकले असण्याची दाट शक्यता आहे. आजच्या तेराव्या दिवशी वैजापूर तालुका कृती समिती या सर्वांचा निषेध म्हणून दंडावर काळी फीत आणि काळे कापड लावून निषेध स्वरूपाचे आंदोलन करत आहे. काहीही झाले तरी हे आंदोलन आता थांबणार नाही. प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागेल. डाॅ. विपीन साळे ( संयोजक : वैजापूर तालुका कृती समिती)

२) वर्क आर्डर झालेले कामे जोपर्यंत सुरू होत नाही. तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच असणार आहे. तालुक्यात आता रस्तेच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे जनतेचे आतोनात हाल होत आहे. म्हणून आता मागार नाही. जनतेच्या कल्याणासाठी आता काहीही करावं लागले तरी चालेल. पण आता मागार नाही. नारायणराव कवडे (संयोजक : वैजापूर तालुका कृती समिती)

३) वैजापूर तालुक्यातील रस्ते हे खुप विचित्र झालेले आहे. नागपूर मुंबई हायवे लासूर ते वैजापूर हा खूपच कठीण झालेल्या आहे. त्यामुळे वाहनचालकाला वाहन चालवणे शक्य नाही. तसेच तालुक्यातील सर्वच रस्ते खड्डेमय झालेले आहे. त्यामुळे आता
मागार नाही. ज्ञानेश्वर आदमणे (सदस्य : वैजापूर तालुका कृती समिती)

४) वैजापूर तालुक्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनलेला आहे. तालुक्यातील पूर्ण रस्ते हे खड्यात गेलेले आहे. तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी झोपलेलेच आहे. त्यांना जाग कधी येणार हा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडलेला होता. त्यामुळे वैजापूर तालुका कृती समितीने उपोषणाचे हत्यार उचलेले आहे. त्यामुळे डाॅ. विपीन साळे व नारायणराव कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण चालू आहे. जोपर्यंत प्रशासन दखल घेत नाही. तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच असणार आहे. बाबा चन्ने उपोषण कर्ते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button