यवतमाळ

कात्री येथे केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

कात्री येथे केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

रूस्तम शेख जिल्हा प्रतिनिधी :- –

यवतमाळ जिल्हयात कळंब पंचायत समिती अंतर्गत कात्री येथे कळंब पंचायत समितीचे सभापती मा संजीवनीताई कासार यांच्या अध्यक्षते खाली पंचायत समिती कळंब व केंद्र शाळा कात्री यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिड़ा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

या स्पर्धेचे उदघाटन सभापती मा संजीवनीताई कासार व उपसभापती मा महादेवराव काळे यांच्या हस्ते झाले या याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख मा गिरीश दूधे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रफुल भुजाडे तसेच गावातील इतर मान्यवर उपस्थित होते

या क्रिडा स्पर्धे मध्ये कात्री केंद्र शाळा अंतर्गत सहा शाळांनी सहभाग नोंदविला कबड्डी खो-खो आधी खेळाचे सामने पार पडले
या स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री खासरे सर यांनी केले तर केंद्र प्रमुख गिरीश दुधे यांनी आभार व्यक्त केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button