Rawer

निंभोरा बु ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गिताचे गायन करुन शिवस्वराज्यभिषेक उत्सव दिन साजरा

निंभोरा बु ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गिताचे गायन करुन शिवस्वराज्यभिषेक उत्सव दिन साजरा

संदिप कोळी रावेर

रावेर : निंभोरा बु ता:रावेर बातमीदार येथील ग्रामपंचायत मध्ये (आज ६ जून २०२१ सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात शिवस्वराज्य अभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शासनाने दिलेल्या संहितेचा अवलंब केला आहे. भगवा स्वराज्य ध्वज आणि शिवश्क राजदंड स्वराज्य गुढी
उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला,छत्रपती शिवाजी महाराज याचे आत्मचरित्र सर्वांनी आत्मसात करावे असे प्रतिपादन ग्राम विकास अधिकारी श्री गणेश पाटील यानी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्य श्री दिलशाद सर यांनी प्रास्ताविक केले व सरपंच सचिन महाले, उपसरपंच रंजनाताई पाटील ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य गण आणि विविध मान्यवरांनी सर्वप्रथम पूजन करत अभिवादन केले व मिठाई वाटत शिवराज्याभिषेक दिन आनंदोत्सव साजरा केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता.म्हणून हा दिवस शिवराज्य अभिषेक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
निंभोरा नगरीतील या कार्यक्रमाला प्रथम नागरिक सरपंच सचिन महाले,ग्राम विस्तार अधिकारी श्री गणेश पाटील, उपसरपंच रंजनाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य सर्व कर्मचारी वर्ग तसेच गावातील विविध मान्यवर व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अगणवाडी सेवीका गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव,,विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जयघोष करण्यात आला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button