Pandharpur

होळकर वाड्यात शिवस्वराज्य दिन साजरा

होळकर वाड्यात शिवस्वराज्य दिन साजरा


रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर येथील चंद्रभागेच्यातीरावर असणाऱ्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर वाडा याठिकाणी आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. होळकर ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होळकर वाड्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्तीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करून त्यांची विधी होत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पूजा करण्यात आली. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचेही पूजन झाले. आणि शिवनामाचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस, शाडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष भास्कर कसगवडे,मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शाम गोगाव,महेश म्हेत्रे, नागेश इंगोले, गणेश पिंपळणेरकर, दत्ता पवार,वैभव लिंगे, पांडुरंग ढोपे, संतोष सादिगले, अण्णा अभंगराव, सुभानराव घोडके, पुजारी चांदुकाका दंडवते,इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन होळकर ट्रस्टचे व्यवस्थापक माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button