Pandharpur

बळीराजा संघटनेकडून जागतिक महिला दिन साजरा

बळीराजा संघटनेकडून जागतिक महिला दिन साजरा

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपुर शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला भगिनींचा जागतिक महिला दिनानिमित्त मासाहेब जिजाऊ यांच्या स्मारका समोर सत्कार करण्यात आला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन दुर्गाताई माने यांच्या शुभहस्ते केले सत्कार मूर्ती म्हणून साधना राऊत दुर्गा माने श्रेया भोसले पूजा लवंगकर गोविंदा गायकवाड संध्या काळे रेखा चंद्रराव भाग्यश्री शिंदे डॉ संगीता पाटील सविता दूधभाते आशाताई नांगरे शुभांगी जाधव कविता राजमाने या सर्व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान बळीराजा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की मासाहेब जिजाऊ पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर या कर्तुत्ववान महिलांनी जगाला संदेश देण्याचं काम केलं होतं संपूर्ण भारत देशामध्ये उत्तुंग काम करणाऱ्या या महान विभूती होत्या त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजातील महिलांनी राजकारण समाजकारण यामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करावं व समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सातत्याने पुढे यावं यावेळी बाबा ग्रुपचे उत्तम बाबा चव्हाण रासपचे पंकज देवकते संजय लवटे नितीन काळे विजय शिरतोडे इत्यादी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button