Nashik

भारतीय बौद्ध महासभा व मुक्ती प्रतिष्ठानच्या वतीने धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा.

भारतीय बौद्ध महासभा व मुक्ती प्रतिष्ठानच्या वतीने धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक ‌‌: येवला शहरातील मुक्ती भूमी कोर्ट मैदान येथील आंबेडकर भवन या सभागृहांमध्ये 65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जाधव हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस भाऊसाहेब जाधव संजय पगारे वसंत घोडेराव यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यावेळी नितीन संसारे मुक्तार तांबोळी दयानंद जाधव यांची भाषणे झाली तसेच वंचित बहुजन आघाडीचे संजय पगारे यांनी मनोगत व्यक्त करताना मुक्ती भूमी ही पायाभरणी असून दीक्षाभूमी ही कळस आहे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचे दीक्षा घेऊन बौद्ध अनुयायांना बुद्धांच्या करुणामय शांतिप्रिय व मानव कल्याणाचा मार्ग दाखवणारा धम्म दिला त्या धमाचे पालन केल्याने माणसाचे हित जोपासले जाते म्हणून या धम्माचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येक भीम अनुयायांचे कर्तव्य असून या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समाज बांधव यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दयानंद जाधव, वसंत घोडेराव,हरी अहिरे, राम कोळगे, मुकतार तांबोळी, साहेबराव भालेराव, नाना पगारे, विठ्ठल जाधव, भागिनाथ पगारे, दीपक लाटे, शशिकांत जगताप, बाळा कसबे, निवृत्ती घोडेराव, प्रभाकर गरुड, प्रभाकर गायकवाड, विनोद आहिरे शिवाजी गायकवाड, शांताराम भाऊ दुनबळे यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दिपक गरुड यांनी सूत्रसंचालन केले तर दिवाकर वाघ यांनी आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button