Ausa

तपसे चिंचोली येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

तपसे चिंचोली येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नांदेड प्रशांत नेटके

ग्रामपंचायत कार्यालय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे प्रथम नागरिक सरपंच महानंदा किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक जोशी ,तलाठी शेखर उत्के ,जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील,प्रशांत नेटके,नितीन कवठाळे,फरीद शेख,महादेव भिसे, तसेच अंगणवाडी सेविका, कार्यकर्त्या,गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*कै .सुशीलाबाई त्रिंबकराव पाटील विद्यालय*

तपसे चिंचोली येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कै .सुशिलाबाई त्रिंबकराव पाटील विद्यालय तपसे चिंचोली येथे राष्ट्रीय दिन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संविधानाचे वाचन, तंबाखूमुक्ती शपथ घेऊन गावचे ज्येष्ठ नागरिक नरशिंग राजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री माधवराव पाटील,मारुती नेटके, मैनू पठाण,लक्ष्मण कांबळे, मुख्याध्यापक बालाजी बिराजदार, सहशिक्षक नागनाथ सुर्यवंशी ,नागेश रामशेट्टी, भास्कर खवडे, तानाजी बिराजदार, तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी गावांतील नागरिक, युवक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपसे चिंचोली*

तपसे चिंचोली येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाचे सामूहिक वाचन,आणि तंबाखूमुक्ती सामूहिक शपथ घेण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शाळेतील लहान मुलांनी आकर्षक वेशभूषा परिधान केले होते
यावेळी प्रमोद नेटके,सोमेश पाटील,बालाजी कवठाळे,
मुख्याध्यापक मोहनराव मोरे,सिद्धेश्वर आयरेकर, विलास चव्हाण, प्रदीप इज्जपवार, शिक्षिका संतोषीमाता लोहार, अनुराधा कनामे,सेविका स्वाती बिराजदार तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी गावातील नागरिक शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button