Pune

महाराणा प्रतापसिंह यांची ४८१ वी तिथी नुसार जयंती अन्नदानाने साजरी…

महाराणा प्रतापसिंह यांची ४८१ वी तिथी नुसार जयंती अन्नदानाने साजरी…

पुणे : हिंदूसूर्य राष्ट्रविर महाराणा प्रतापसिंह यांची ४८१ वी जयंती मोठ्या उत्साहात व कोरोनाचे सर्व नियम पळून निगडी यथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपमहापौर सौ. हिरानानी घुले, पक्षनेते नामदेवजी ढाके, नगरसेविका सुमनताई पवळे, नगरसेविका कमलताई घोलप, प्रभाग अध्यक्ष कुंदनशेठ गायकवाड, अश्विनीताई राजपूत भारतीय जनता युवा मोर्चा सहसंयोजिका, स्वीकृत नगरसेवक दिनेशभाऊ यादव, प्रफुल्ल पुराणिक साहेब, गायकवाड साहेब, राजपूत समाज संघटन सचिव श्रीराम परदेशी, राष्ट्रिय राजपूत करणी सेनेचे प्रदेश महासचिव, राजपुत समाज संघटन भोसरी विधानसभा अध्यक्ष राणा अशोक भाऊ इंगळे, मुकेशभाऊ राजपूत, राजपूत समाज संघटन सोशल मीडिया व प्रसिद्धी प्रमुख गणेशसिंह राजपूत, नंदकुमार ढवळस्कार साहेब इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच जयंती निमित्त समाज बांधवांचा वतीने गरजूंना अन्नदान करण्यात आले अन्नदान कार्यक्रमासाठी बाबासाहेब पवार, विजय चव्हाण, रवींद्र चव्हाण, गणेश पवार, दत्त पवार, संतोष चव्हाण, भाऊ पवार, देविदास चव्हाण,सचिन पवार, रुपेश राजपूत, संतोष राजपूत, सचिन चव्हाण, युवराज पवार, सोमनाथ पवार, नागेश पवार, जयपाल गिरासे, सोपान पाटील, मनोज गिरासे, आकाश इंगळे, विनोद इंगळे, सागर चव्हाण, रामभाऊ चव्हाण, शुभम पवार, उमेश राजपूत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. काही कारणास्तव राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड अध्यक्ष शिवकुमार सिंह बायस हे बाहेर गावी असल्यामुळे कार्यक्रमास उपस्थित नसल्याने त्यांनी कार्यक्रम यशस्वी झाल्या बद्दल सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button