Maharashtra,Nanded

रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या वतीने नामविस्तार दिन जल्लोषात साजरा.

रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या वतीने नामविस्तार दिन जल्लोषात साजरा.

नांदेड जिल्हाप्रतिनिधी (वैभव घाटे)

मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे दि.14 जानेवारी 2020 रोजी येथील मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने व पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात
विश्वशातींचे उद्गाते, आणि कासल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता संपूर्ण विश्वच आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे विश्व वंदनीय महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ला मिळावे म्हणून 14 जानेवारी 1994 मध्ये ज्या महान शहीद हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, त्यामध्ये प्रामुख्याने टेभूर्णी येथील शहीद पोचिराम कांबळे,जनार्दन मवाडे, नांदेड येथील गौतम वाघमारे, चंदर कांबळे या सह अनेक शूरवीर या नामांतर लढ्यात शहीद झाले त्या सर्व शहीदांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाचे संयोजक भारत सोनकांबळे यांनी केले होते.
या कार्यक्रमाला गावातील दीपक सोनकांबळे, प्रल्हाद सोनकांबळे, दिलीप सोनकांबळे, रमेश सोनकांबळे, हर्षदीप सोनकांबळे, सामाजिक कार्यकर्त्यां ललीताबई सोनकांबळे भगवान सोनकांबळे, खंडेराव सोनकांबळे,निवृत्ती पोटफोडे आदीसह अनेक महिला पुरुषांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी केले ते आपल्या मनोगतातून पुढे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरातील विद्यापीठ आहे. मराठवाडा विभागातील हे सर्वात प्रमुख विद्यापीठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. पुढे नामांतराच्या लढ्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने मराठवाडा विद्यापीठ याचे नाव बदलून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार केला गेला असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रल्हाद सोनकांबळे यांनी केले.

Leave a Reply

Back to top button