Amalner

Amalner: थोर सत्यशोधक गुरु रविदास जयंती निमित्त अंमळनेर मनसे परिवारातर्फे साजरी

थोर सत्यशोधक गुरु रविदास जयंती निमित्त अंमळनेर मनसे परिवारातर्फे साजरी

गुरु रविदासांचे जे चित्र सध्या पहावयास मिळते, ते विकृत व विचित्र आहे. गुरु रविदास चर्मकार समाजात जन्मले होते म्हणून त्यांना फक्त चर्मकारानीच मानावे याची दक्षता चित्र बनविणाऱ्या व बनवून घेणाऱ्यांनी घेतली.गुरु रविदासांनी केवळ चर्मकारांना नव्हे तर संपूर्ण मानव जातीला मार्गदर्शन केले. मानवतेचा,बंधुत्वाचा संदेश दिला.हिंदू धर्मातील अज्ञान अंधश्रद्ध,रूढी, परंपरा,अवडंबरवाद,दैववाद इत्यादीवर घणाघाती हल्ला करून गुरु रविदासांनी नवीन मानवतावाद मांडला.

गुरु रविदास यांनी हिंदू किंवा वैदिक धर्माचे अनुकरण केले नाही. या धर्मावर त्यांनी टिकाच केली. तेराव्या चौदाव्या शतकात भारतात जातिवाद,धार्मिक पराकोटीला पोचला होता. त्यावेळी भारताची स्थिती सर्व क्षेत्रात करुणाजनक व भयावह होती. स्वदेशीय धार्मिक छळवाद आणि परकीय आक्रमण यामुळे भारतात अस्थिरता माजली होती.विशेषता उत्तर भारतातील परिस्थिती भयावह होती. भूत,प्रेत,पूजा,अर्धा, जप,तप,शाप, करणी, भानामती आणि जातीयवाद यामुळे मानवता होरपळून निघत होती.विशेषता अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मागासवर्गीयांचा, दिनदुबळ्या दलित शोषितांचा प्रचंड छळकरण्यात येत होता.

अशा परिस्थितीत गुरु रविदास,कबीर,अनंतानंद,सुखानंद,सुरसुरानंद,सेना इत्यादी संतांनी मानवतेला सावरण्याचा प्रयत्न केला त्यात गुरु रविदासांचे कार्य अलौकिक होते. त्यांनी गद्य व पद्य लिखाण केले सतत ब्राह्मण करून, ठिकठिकाणी जाहीर प्रवचन दिले आपल्या कृती व आचरणातून मानवतावाद रुजविला.

जनमाणसात क्रांतीची ज्वाला पेटविणारे काव्य निर्माण केले.म्हणून एक बंडखोर कवी,थोर सत्यशोधक, महान समाजसुधारक,राष्ट्रीय ऐक्यासाठी झटणारे,व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करणारे मानवतावादी विचारवंत अशा सर्वव्यापी व कर्तुत्ववान गुरु रविदास यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंमळनेर मनसे विधानसभा परिवारातर्फे त्यांची जयंती निमित्त जयती साजरा करण्यात करण्यात आली अंमळनेर मनसे तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे) अंमळनेर मनसे शहराध्यक्ष धनंजय रविद्र साळुंखे (धनु भाऊ) व मनसे सैनिक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button